मराठ्यांचे ओबीसीकरण करणारा काळा जीआर रद्द करा

24 Sep 2025 19:15:28
सकल ओबीसी समाजाची मागणी : नागपूर येथे महामोर्चा

यवतमाळ, 
मराठ्यांचे ओबीसीकरण करणारा २ सप्टेंबरचा जीआर तत्काळ रद्द करण्यात यावा. तसेच खोटे कुणबी दाखले देणे थांबवावे, या प्रमुख मागणीसाठी नागपूर येथे येत्या १० ऑक्टोबर रोजी सकल OBC Mahamorcha ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रपरिषदेत डॉ. ज्ञानेश्वर गोबरे यांनी दिली.
 
 
obc
 
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, OBC Mahamorcha ओबीसी समाजाने एल्गार आहे. या जीआरला विरोध करण्यासाठी आणि ओबीसींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी शुक‘वार, २६ सप्टेंबरला दुपारी २ वाजता सेलिब‘ेशन हॉल, मेडिकल चौक, यवतमाळ येथे ओबीसी जागृती कार्यक‘माचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय हिताला धोका निर्माण होत असल्याचे नेत्यांनी सांगितले. हजारो वर्षांपासून मिळालेला शिक्षण, नोकर्‍या व हक्क संपुष्टात आणण्याचा कट म्हणजे हा जीआर असल्याचा आरोप नेत्यांकडून करण्यात आला.
 
 
या कार्यक्रमास माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री माणिकराव ठाकरे, खासदार संजय देशमुख, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार संजय देरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्यासह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी राहणार आहेत. पत्रपरिषदेत प्रकाश जानकर, अनिल जिपकाटे, हरीश कुडे, माधवी पंचबुद्धे, माया गोरे, कमल खांडरे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0