निम्न पैनगंगा धरणविरोधी लढा नव्या ताकदीने लढू

24 Sep 2025 20:19:57
बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांचा निर्धार

आर्णी, 
Penganga Project निम्न पैनगंगा धरणाच्या कामाला सुरवात केल्याचे सांगण्यात येत असले तरीही निम्न पैनगंगा धरणविरोधी लढा पुन्हा नव्या ताकदीने आणि जोमाने असा निर्धार धरणविरोधी संघर्ष समितीने बुधवार, २४ सप्टेंबर रोजी झालेल्या तातडीच्या बैठकीत जाहीर केला आहे. भविष्यातला लढा हा कशा पद्धतीने लढायचा याबाबतचा निर्णय बुडीत क्षेत्रातील पहिल्या टप्प्यातील सर्व गावांमध्ये पुढील आठवड्यात बैठका घेऊन लोकांचे मत जाणून घेऊन पुढचा निर्णय घेण्यात येईल, असेही या बैठकीत ठविण्यात आले. पुणे येथील हरित धरणविरोधी संघर्ष समितीने दाखल केलेल्या याचिकेचा निकाल पाटबंधारे विभाग व शासनाच्या बाजूने लागला. त्यामुळे पाटबंधारे विभागाने दोन दिवसांपूर्वी खंबाळा येथे दीडशे पोलिसांच्या उपस्थितीत केवळ दहा-बारा अधिकारी व कर्मचार्‍यांच्या साक्षीने निम्न पैनगंगा प्रकल्पाचे भूमिपूजन केले.
 
 
Nirdhar
 
त्याचे फोटो व्हायरल करून पाटबंधारे विभागाने बुडित क्षेत्रातील लोकांना आम्ही २८ वर्षार्ंनंतर Penganga Project निम्न पैनगंगा प्रकल्पाचा जिंकला आणि या प्रकल्पाच्या कामाला आम्ही भूमिपूजन करून सुरुवात केली आहे, हे दाखविण्याचा या निमित्ताने प्रयत्न केला. निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा यांच्यावतीने गेल्या २८ वर्षांपासून शासन विरोधात विविध पातळ्यांवर या प्रकल्पाच्या विरोधात लढा लढत आहे. या २८ वर्षांच्या काळात धरणविरोधी संघर्ष समितीने धरणाच्या उद्घाटनाची खुंटीसुद्धा रोवू नाही. दोन दिवसांपूर्वी हरित लवादाचा निकाल धरणविरोधी संघर्ष समितीच्या विरोधात लागल्याने बुडित क्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले आणि बुडीत क्षेत्रात या निकालाने एकच खळबळ उडाली.
 
 
 
Penganga Project निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांनी वरुड (तुका) येथे ग‘ामपंचायत भावनामध्ये विदर्भ मराठवाड्यातील मोजक्या शंभर कार्यकर्त्याची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत पुढची रणनीती काय असावी, लढा कशा पद्धतीने लढायचा, लढायचं तर कशा पद्धतीने लढायचं, या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करायची, यावर चर्चा झाली. गावागावात जाऊन बैठका घेऊन लोकांचे काय मत आहे, लोकांची विरोधाची धार तशीच आहे की लोकांचा विरोध मावळला, हे पाहण्यासाठी पहिल्या टप्प्यातील गावागावात जाऊन धरण विरोधीसंघर्ष समितीचे पदाधिकारी लोकांशी चर्चा त्यांची मतं जाणून घेणार आहे. लोकांचा जो काही निर्णय असेल त्याप्रमाणे धरणविरोधी संघर्ष समिती पुन्हा नवीन जोमाने, नवीन दमाने एकजुटीने हा लढा लढणार आहे.
 
 
 
Penganga Project धरणाचे काम सुरू झाले असले तरी धरणविरोधी संघर्ष समितीची मंडळी हजारो कार्यकर्त्यांसह कधीही खंबाळा येथे धडक देऊन सुरू असलेले काम बंद पाडू शकतात, असा सूरही बैठकीचा होता, हे विशेष. पुणे लवादातील केस हरलो तरी औरंगाबाद व नागपूर उच्च न्यायालयातील केसचा निकाल येणे अद्याप बाकीच आहे. त्यामुळे लवादाच्या निकालाने धरणविरोधी संघर्ष समिती खचून जाणार नाही, अशी सर्व पदाधिकार्‍यांनी आपली भूमिका जाहीर केली. या बैठकीला समितीचे अध्यक्ष प्रल्हाद जगताप, रामकृष्ण राऊत, मुबारक तंवर, प्रल्हाद गावंडे, अ‍ॅड. येरावार, विजय राऊत, प्रदीप गावंडे, जयराम मिश्रा, उत्तम भेंडे, गजानन डाखोरे, उत्तम मिरासे, विजय पाझारे, बंटी जोमदे, कैलास उकले, सुरेश महले, त्र्यंबक पाटील, भाऊ तितरे, सुनील गावंडे, सतीश नागोसे, घनश्याम मेश्राम, रवींद्र भोंगाडे, मंगेश देशमुख, संजय राकेश, गुलाब मेश्राम, दिलीप ठाकरे आणि विदर्भ-मराठवाड्यातील अनेक सरपंच व प्रमुख मंडळी उपस्थित
Powered By Sangraha 9.0