सणासुदीच्या काळात धावणार पूजा स्पेशल ट्रेन

24 Sep 2025 22:02:03
सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन ते जयनगर
 
नागपूर,
सण उत्सवांच्या काळात प्रवाशांच्या सोयींसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने Pooja Special Train पूजा स्पेशल निर्णय घेतला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशन (नागपूर) ते जयनगर (बिहार) दरम्यान ही स्पेशल ट्रेन धावणार असून नागपूरच्या अनेक प्रवाशांना यामुळे दिलासा मिळाला आहे. मुख्यत: नागपूरसह विदर्भातील प्रवाशांना बिहारकडे जाण्यासाठी ही थेट रेल्वे अत्यंत सोयीस्कर ठरणार असल्याची माहिती रेल्वे प्रवाशांनी दिली आहे. अनेक दिवसांपासून अतिरिक्त रेल्वेची मागणी जात होती. आता नव्याने एक पर्याय उपलब्ध झाल्याने प्रवाशांची धावपळ कमी होणार आहे.
 
 
pooja
 
गत काही वर्षात प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा दिला आहे. रेल्वेच्या नागपूर विभागाने Pooja Special Train पूजा स्पेशल सुरु करण्याची मागणी केली होती. एका नव्या गाडीचा समावेश झाल्याने विदर्भातील लाखो प्रवाशांना थेट प्रवासाचा घेता येणार आहे. या स्पेशल ट्रेनच्या गाड्यांपैकी ट्रेन क्रमांक ०८८६९ (इतवारी ते जयनगर) ही गाडी १६, २३, ३० ऑक्टोबर आणि ६ नोव्हेंबर रोजी इतवारी रेल्वे स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी रात्री १०.३० वाजता जयनगर येथे पोहोचेल. दुसरी स्पेशल, ट्रेन क्रमांक ०८८७० (जयनगर ते इतवारी) ही गाडी २५ ऑक्टोबर आणि १, ६ रोजी जयनगरहून रात्री १२.३० वाजता बिलासपूर-हडपसर (पुणे)-बिलासपूर फेस्टिव्हल स्पेशल बिलासपूर-यलहंका-बिलासपूर दुर्ग-सुलतानपूर-दुर्ग तसेच हजरत निजामुद्दीन-दुर्ग -पटणा फेस्टिव्हल स्पेशल रेल्वे इतवारी शालीमार-इतवारी इतवारी-धनबाद फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन गोंदिया-पटणा फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन या सर्व गाड्यांमध्ये प्रवाशांना कन्फर्म सीट मिळण्याची हमी देण्यात आली आहे. नवरात्र दुर्गापूजा, दिवाळी आणि छठपूजेच्या काळात सोयीसाठी ही ट्रेन पूजा स्पेशल म्हणून धावणार आहे.
Powered By Sangraha 9.0