रिपाइं (आठवले) जिल्हाध्यक्ष निवड बैठकीत दोन गटांत वाद पोलिसांनी वाद मिटविला

24 Sep 2025 19:44:13
बुलढाणा,
Republican Party of India रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष निवडीसाठी दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीदरम्यान दोन गटांत वाद झाला. या बैठकीस बैठकीस रिपाइं प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, प्रादेशिक संघटक संघटक सुधाकर तायडे तसेच उत्तर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, मराठवाडा नेते बालकृष्ण इंगळे, संभाजीनगरचे युवा नेते नितीन सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष वाशीम गोवर्धन चौतमोल उपस्थित होते.
 

India 
पदाधिकार्‍यांच्या बैठकीत हातघाईपर्यंत गेलेला वाद अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपाने निवळला. पक्षाने जिल्हाध्यक्ष निवडीसाठी ही बैठक बोलावली होती. निरीक्षक म्हणून छत्रपती संभाजीनगर येथून पक्षाचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम आणि सुधाकर तायडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हाध्यक्षपदासाठी शरद खरात, विजय मोरे, विजय साबळे, विजय पवार, भैय्यासाहेब पाटील सतीष बोर्डे, मुरलीधर गवई, संजय वाकोडे यांच्यासह काही इच्छुकांचे नावे चर्चेत होती. सुरुवातीला निरीक्षकांसमोर बाजू मांडताना दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला आणि खुर्चाही फेकल्या. या घटनेनंतर निरीक्षकांनी पुन्हा बैठक घेऊन सर्व इच्छुकांची मते ऐकून घेतली. मात्र गोंधळामुळे कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आला नाही. बैठकीला गालबोट लावणार्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बुलढाणा शहर पोलिस निरीक्षक रवी राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आली होती. जिल्हाध्यक्षपदी इच्छूक असणार्‍यांची यादी पक्षाचे सर्वेसर्वा केंद्रियमंत्री रामदास आठवले यांना पक्षाचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव यांनी पाठविली आहे.
Powered By Sangraha 9.0