दहा पिढ्यापासून नवसाला पावणारी सती माता व गुरु निरंजन बाला पीर महाराज मंदिर

24 Sep 2025 18:27:35
प्रा. दौलत धोटे
आरमोरी,
Sati Mata temple Armori, येथील श्रीराम मंदिर देवस्थानात जवळपास दहा पिढ्यांपासून नवसाला पावणारी सती मातेचा मंदिर व गुरु निरंजन महाराज बाला पीर हे पुरातन मंदिर आहे.
 
 
या मंदिराची आख्यायिका अशी आहे की, सती माता ही पहिल्यांदा वैरागड या ठिकाणी प्रकट झाली आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या पादुका ठेवल्या. त्या ठिकाणी पादुकाची स्थापना झाली. मात्र ती त्या ठिकाणाहून आरमोरी या ठिकाणी आली.
 
 
Sati Mata temple Armori, Guru Niranjan Bala Pir Dargah
राम मंदिर परिसरात धिवर, कोळी समाज बांधव पुजारी विठ्ठल दाजीबा दुमाने यांनी या सती माता मंदिराची व गुरु निरंजन महाराज बाला पीर सवारी या दर्ग्याची सुद्धा स्थापना केली. दाजीबा राजीव भगत हे धीवर समाजातील जुने भगत असून त्यांनी ही या मंदिराची स्थापना केली. या ठिकाणी सती मातेचा मंदिर उभारण्यात आला. मात्र ते कोणतीही देणगीतून न उभारता स्वतः दाजीबा रावजी दुमाने यांनी उभारले. त्यानंतर या मंदिराची देखभाल आणि पूजाअर्चा पुजारी विठ्ठल दुमाने यांनी केले. त्यानंतर ते मरण पावल्यानंतर आता गजानन विठ्ठल धुमाने हे भक्तिभावाने सती माता मंदिराची पूजा चर्चा करत आहेत. या ठिकाणी काही दिवसापूर्वी गुरु निरंजन महाराज बाला पीर यांची सुद्धा सवारी लागत होती. मुसलमान समाज सुद्धा ही सवारी करण्यासाठी या गुरु निरंजन महाराज बाला पीर या मंदिरात येत राहायचे. मात्र आता कोरोनाच्या कालखंडापासून त्यांचे येणे बंद झाले आहे. या ठिकाणी दर सोमवारला मोठ्या भक्ती भावाने देवपूजा करण्यात येते. मंगळवारला सती माता मंदिरात ज्या ज्या लोकांनी नवस बोलले आहेत, ते फेडायला येत असतात. नवसाची प्रथा या ठिकाणी अजूनही मोठ्या सुरू आहे. त्यामुळे नवसाला पावणारी सती माता असा उल्लेख करतात. या ठिकाणी कोणी बकर्‍याचा नवस तर कुणी साधा तर कोणी कढईचा प्रसाद चढवितात.
 
 
 
 
या ठिकाणी प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून लोक नवस फेडायला येत असतात. सुरत, नागपूर, गुजरात, अहमदाबाद, हैदराबाद, मुंबई, पुणे या ठिकाणाहुन सुद्धा या मंदिरात नवस फेडायला लोक येतात. या मंदिराच्या माध्यमातून अनेक लोकांना औषधोपचार सुद्धा करण्यात येतो. प्रामुख्याने ज्या महिलांना मुलं- बाळ होत नाही, अशा महिला सुद्धा या ठिकाणी औषधी घेण्यासाठी येतात. या ठिकाणी कुत्रा चावल्याची औषध ही प्रामुख्याने मिळत असून अनेक लोक या औषधीपासून बरे झालेले आहेत. नवरात्रीच्या दिवसांमध्ये अष्टमीला या ठिकाणी हवन करण्यात येतो. हे हवन सुद्धा या दुमाने परिवाराकडूनच करण्यात येते. सती मातेला प्रामुख्याने सुरुवातीला झिंगराइन् या नावाने ओळखले जायचे. नंतर तिचे प्रारूप हे सती मातेच्या रूपात झाले.
 
 
मंदिर खूप पुरातन असल्यामुळे त्या मंदिराचे आता दुमाने परिवाराकडून साफसफाई करण्यात येते. सती मातेचे मंदिर अगदी राम मंदिराच्याजवळ आहे. सती मातेच्या मंदिरात प्रामुख्याने सती मातेची मूर्ती सोबतच दुर्गा मातेची मूर्ती आणि नागोबाची मूर्ती आहे. दुर्गा मातेच्या शेजारी त्रिशूळ आहे. कोष्टी समाजबांधव प्रामुख्याने या ठिकाणी नवस फेडायला येत असतात. या ठिकाणी खूप जणांची श्रद्धा असल्याने लोक भक्ती भावाने पूजाअर्चा करण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी दुरवरुन येत असतात.
Powered By Sangraha 9.0