नवशती अंबिका मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ

24 Sep 2025 15:44:55
देवळी,
sharadiya navratri festival स्त्री शतीचे प्रतीक असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवास २२ सप्टेंबरपासून सुरूवात झाली. तालुयात असलेले सुप्रसिद्ध ओम नवशती अंबिका भतीधाम संस्थानात नवरात्र उत्सव साजरा होत आहेे. मंदिरात आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई व भाविकांना दर्शन सोयीचे व्हावे यासाठी उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच पार्किंगची सोय देखील करण्यात आलेली आहे.
 
 

navchandi  
 
 
बोपापूर वाणी हे वर्धा-यवतमाळ मार्गावरील शिरपूरपासून पूर्वेस ६ किलोमीटर अंतरावर आहे. हे देवीचे शतिपीठ अडीच एकर परिसरात असून श्री यंत्राच्या आकाराचे विदर्भातील एकमेव मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य कोल्हापूरची महालक्ष्मी, वेदमाता गायत्री, तुळजापूरची भवानी, वैष्णव देवी, माहूरची रेणुका, ज्वालामाता, अन्नपूर्णा, महाकाली, सरस्वती महाशती संगमवरी शिल्पात गर्भगृहात बसवण्यात आल्या आहेत.sharadiya navratri festival बाहेर वरदविनायक व तिरुपती बालाजीचे मंदिर आहे. येथे काळा मारुतीची स्थापना करण्यात आलेली आहे. आई अंबिका भारती यांच्या मार्गदर्शनात मंदिर परिसराचा विकास होत आहे. शारदीय नवरात्रात दररोज भगवतीचे पूजा अर्चा आराधना तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. या मंदिरास शासनाकडून ब दर्जा मिळालेला आहे. भाविकांनी आयोजित सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराच्या विश्वस्तांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0