मानलेल्या काकानेच केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

25 Sep 2025 17:26:19
अनिल कांबळे

नागपूर,
sexually assaulted मानलेल्या काकानेच अल्पवयीन मुलीला आंघाेळ करताना बघून तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकरणी त्या नराधम काकाला 5 वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त सश्रम कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एच. ग्वालानी यांनी हा निर्णय दिला. महेश रामचंद्र मसराम (48) असे आराेपीचे नाव आहे.
 

sexually assaulted  
महेश मसराम हा काचीपुरा येथील रहिवासी आहे. ही घटना 1 जुलै 2021 ते 1 डिसेंबर 2022 या कालावधीत घडली. त्यावेळी पीडित मुलगी अंघाेळ करीत असताना आराेपी तिला चाेरून पाहात हाेता, तसेच तिला वारंवार घरी बाेलावून अश्लील कृत्य करीत हाेता. त्यामुळे मुलीच्या वडिलाने बजाजनगर पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदविली त्यावरून आराेपीला 25 मार्च 2024 राेजी अटक करण्यात आली. पाेलिस उपनिरीक्षक मिनाक्षी काटाेले यांनी तपास केला. सरकारच्या वतीने अ‍ॅड. रश्मी खापर्डे यांनी काम पाहिले. या प्रकरणात विशेष न्यायालयाने आराेपीला 5 वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
Powered By Sangraha 9.0