विद्यापीठात शिवरायांचा पुतळा उभारण्यास सुरुवात

25 Sep 2025 19:52:16
नागपूर ,
Dr. Madhavi Khode Chavere राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक प्रसंगाच्या वेळेचा भव्य सिंहासनारूढ पुतळा उभारण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या शुभहस्ते गुरुवार, दिनांक २५ सप्टेंबर रोजी निर्माण कार्याचा शुभारंभ पार पडला.
 
 
Dr. Madhavi Khode Chavere
 
विद्यापीठाच्या महाराज बाग चौक स्थित छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय परिसरात आयोजित कार्यक्रमाला प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष श्रीमंत राजे मुधोजी भोसले, यांच्यासह इतर मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षाचे औचित्य साधून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून राज्यभिषेकाच्या वेळेच्या पुतळ्याची निवड करण्यात आली आहे. इतिहासकारांनी लिहिलेल्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यानुसार पुतळ्याची उभारणी होणार आहे. पुतळ्या सोबतच संग्रहालय आणि ग्रंथालय देखील उभारले जाईल यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा इतिहास प्रदर्शित केला जाईल लोक सहभागातून या पुतळ्याचे निर्माण होत आहे.
 
 

- राजदंडधारी एकमेव पुतळा
 
 
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कांच धातूचा राहणार असून सिंहासना रूढ पुतळ्याची उंची ३२ फूट असून त्यावरील छत्र सात फुटाचे राहणार आहे पुतळ्याचे वजन दहा हजार किलो असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातात राजदंड राहणार आहे जगातील अशा स्वरूपाचा हा पहिलाच पुतळा राहणार आहे.
Powered By Sangraha 9.0