इरफान सोलंकी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिलासा

25 Sep 2025 16:37:39
उत्तर प्रदेश,
Irfan Solanki  समाजवादी पक्षाचे नेते आणि कानपूरमधील माजी आमदार इरफान सोलंकी यांना अखेर अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या गँगस्टर प्रकरणातही त्यांना जामीन मंजूर करण्यात आला असून, आता त्यांच्या जेलमुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायमूर्ती समीर जैन यांच्या एकल खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
 

Irfan Solanki 
इरफान सोलंकी यांच्यासह त्यांच्या भावाला – रिजवान सोलंकी – आणि सहआरोपी इजराइल आटेवाला यांनाही या प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. या निर्णयामुळे आता सोलंकी बंधूंना सर्व प्रकरणांतून जामीन मिळाल्यामुळे त्यांची कारागृहातून सुटका लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर इरफान सोलंकी यांच्या आई खुर्शीद सोलंकी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त करत "अल्लाहचे आभार" मानले. सोलंकींचे वकील शिवाकांत दीक्षित यांनी सांगितले की, ज्या एकमेव प्रकरणात अजून जामीन मिळाला नव्हता – म्हणजेच गँगस्टर अ‍ॅक्टखालील गुन्हा – त्यातही आता जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे त्यांना अडवणूक करणारा कोणताही कायदेशीर अडथळा उरलेला नाही.
 
 
 
गेल्या वर्षी Irfan Solanki २२ नोव्हेंबर २०२२ रोजी कानपूरमधील जाजमऊ परिसरात राहणाऱ्या एका महिलेने सोलंकींवर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला होता. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सोलंकी व त्यांच्या समर्थकांनी जमीन हडपण्याच्या उद्देशाने तिच्याकडे रंगदारीची मागणी केली आणि विरोध केल्याने तिच्या झोपडीत पेटवून दिली. या प्रकरणात इरफान सोलंकी, त्यांचा भाऊ रिजवान, तसेच इजराइल आटेवाला, शौकत पहलवान आणि शरीफ यांना दोषी ठरवून एमपी-एमएलए विशेष न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.या शिक्षेमुळेच इरफान सोलंकी यांची सीसामऊ विधानसभा मतदारसंघातील आमदारकी रद्द करण्यात आली होती. आता, उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या राजकीय पुनरागमनाची शक्यता चर्चेत आली आहे.आजम खान यांच्यानंतर समाजवादी पक्षाचे दुसरे मोठे नेते म्हणून ओळखले जाणारे इरफान सोलंकी हे देखील कारागृहाबाहेर येण्याच्या तयारीत असून, येत्या काही दिवसांत त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0