नागपूर,
Nagpur heavy rain, हवामान विभागाने नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्यानंतर नागपूरसह जिल्ह्यात ठिकठिकाणी दमदार पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण कायम असताना सायंकाळी ५च्या सुमारास पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे नागपुरातील तापमान २ ४ सेल्सियसने कमी झाले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पुढील दोन दिवस नागपूरसह विदर्भात विजांसह जोरदार पावसाचा इशारा दिला असल्याने सावधगिरी बाळगण्याची सुचना देण्यात आली आहे.
पावसाची तीव्रता झाली कमी
सप्टेंबर महिन्यातील सर्वाधिक दिवस मुसळधार पावसाचे भयावह रूप नागपुरकरांनी अनुभवले. दिवसभर शांत राहिलेल्या काळ्या ढगांमधून सायंकाळी सरी बरसल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. गत आठवडयात मेघगर्जनेसह विजांच्या प्रचंड कडकडाटाने नागरिकांना चांगलीच धडकी भरली होती. पावसाची तीव्रता आता कमी झाली असून गुरुवारी तासभर पावसाने रस्त्यांना पुन्हा तलावाचे स्वरुप प्राप्त झाले होते. शासकीय कार्यालय सुटण्याच्या वेळीच पाऊस बरसल्यामुळे पावसाचा जोर कमी होईपर्यंत प्रतिक्षा करावी लागली. किमान तापमान अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २५.४ अंश सेल्सिअस तापमान आणि सायंकाळपर्यंत शहरात ११.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
बहुतेक रस्ते जलमय
पावसामुळे शहरातील बहुतेक रस्ते जलमय झाले होते. धंतोली, सीताबर्डी,कॉटन मार्केट, गणेशपेठ, बसस्थानक, मेडीकल चौक, अजनी, नरेंद्रनगर,खामला आदी भागातील रस्त्यावर नेहमीप्रमाणे पाणी साचले होते. सीताबर्डीच्या पूलावर पाण्यामुळे वाहतुकीचा वेग होता. रहाटे कॉलणी चौकापर्यंत वाहनांचा खोळंबा झालेला दिसून आला. तसेच शहरातील सखल भागातील वस्त्यांमध्ये नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागला. नागपूरसह राज्यात १ जून ते २२ सप्टेंबर दरम्यान १२ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. या कालावधीपर्यंत सरासरी ९५३.२ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र आतापर्यंत राज्यातील सरासरीने १ हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडला