पंडित दीनदयालजींच्या पुतळ्याला अभिवादन

25 Sep 2025 18:56:32
तभा वृत्तसेवा यवतमाळ,
Pandit Deendayal Upadhyay Jayanti एकात्म मानव दर्शन व अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त यवतमाळ ते जांब मार्गावर पावणे चार एकर परिसरात उभारण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यानातील पंडितजींच्या 71 फूट उंचीच्या भव्य पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ पद्मश्री सुभाष शर्मा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. सहसंपर्कप्रमुख सुनील देशपांडे, सुप्रसिद्ध समाजसेवी डॉ. प्रकाश नंदुरकर, दीनदयाल सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरहर देव, सचिव विजय कद्रे, माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे, अस्थिरोग तज्ञ डॉ. महेश चव्हाण यांनी दीनदयालजींच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून अभिवादन केले.
 
 
 

Pandit Deendayal Upadhyay Jayanti
भारतावर प्रेम करायचे असेल तर दलित, वंचित, पीडितांचे दुःख दूर करण्यासाठी काम केले पाहिजे. हा अंत्योदयाचा विचार पुढे नेणे, हेच दीनदयालजींचे खरे स्मरण होय, असे विचार याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.याप्रसंगी दीनदयाल उपाध्याय स्मारक समितीचे अजय मुंधडा, चंद्रशेखर बिडवाई, मनीष गंजीवाले, प्रवीण खांदवे, जगदीश शर्मा, सूरज गुप्ता, नितीन गिरी, योगेश पाटील, शेखर ब्राम्हणे, मनीष दुबे, मनोज मुधोळकर, कीर्ती राऊत, नंदा जिरापुरे, बाबा कपिले, ज्योती चव्हाण, लीना नंदुरकर, डॉ. ललिता घोडे, रेखा कोठेकर, शैला मिर्झापुरे, नीलिमा मंत्री, मधुरा वेळूकर, डॉ. कविता करोडदेव, माधवी राजे, मीरा घाटे, साधना देव, दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या विविध प्रकल्पांचे पदाधिकारी, विवेकानंद छात्रावासाचे विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रांतील गणमान्य नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0