मुलींनो, तुम्ही लाठीकिठीचे फक्त स्टेटस ठेवा: गाते

25 Sep 2025 20:14:32
वर्धा, 
Sanjay Gate : सध्या नवरात्र सुरू आहे. सर्वत्र गरबा आणि दांडियाची गर्दी सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासुन गरबा आणि दांडियाविषयी भीती व्यत केली जात आहे. परंतु, त्या भीतीला पळवण्यासाठी तुम्ही केवळ लाठीकाठी फिरवताचे तुमच्या मोबाईलच्या डीपीवर किंवा स्टेटस ठेवा. तुम्हाला छेडण्याची कोणाची हिम्मतच होणारा नाही, असे मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय गाते यांनी केले.
 
 
gaate
 
 
 
माजी नगरसेवक श्रेया देशमुख यांच्या पुढाकाराने जागर फाऊंडेशन आणि क्रीडा भारती यांच्या संयुत वतीने स्थानिक केसरीमल कन्या शाळेच्या मैदानावर नवरात्रानिमित्त शक्ती साधना तलवार, लाठी-काठी प्रशिक्षण शिबिराचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रा. स्व. संघाचे नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख, वुमेन्स एजुकेशन संस्थेचे अध्यक्ष माधव पंडित, तरुण भारतचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल व्यास, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष वैशाली येरावार, क्रीडा भारतीचे जिल्हा संयोजक हरीश गांधी, कार्यक्रमाच्या संयोजक श्रेया देशमुख, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष मंगेश झाडे यांची उपस्थिती होती.
 
रा. स्व. संघाचे नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांनी सक्षम महिला म्हणजेच सक्षम समाज असल्याचे सांगितले. समाजातील माता-भगिनींमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना स्वसंरक्षणाचे तंत्र शिकविणे तसेच शारीरिक आणि मानसिक बळकटी देणे हा आहे. पारंपरिक भारतीय युद्धकलेचा वारसा असलेल्या तलवार आणि लाठी-काठी प्रशिक्षणाद्वारे महिलांना स्वतःचे रक्षण करण्याची क्षमता मिळावी यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्रेया देशमुख यांनी दिली. वैशाली येरावार यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या.
 
 
यावेळी प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिके शिकवली. या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यत करण्यात आला. दांडिया सोबतच दंडाची आवश्यकता आहे व महिलांनी स्वसंरक्षण व स्वस्वाभिमान या बाबीवर भर दिल्यास समाज अधिक सुदृढ होईल यासाठी अधिकाधिक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जागर फाडेशनच्या अध्यक्ष श्रेया देशमुख व क्रीडा भारती चे अध्यक्ष हरीश गांधी यांनी केले. संचालन योगेश केळकर यांनी केले.
 
 
कार्यक्रमाला श्रीधर देशमुख, सारंग परिमल, निलेश पोहेकर, प्रशांत झलके, अभय नगरे, पूनम डकरे, कविता कामनापुरे, रोहिणी पाटील, संदीप आपटे, माधवी व्यास, मोनिका नगरे आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0