मुलीवर बलात्कार आणि खून करणाऱ्या संजयच्या फाशीवर ऑक्टाेबरमध्ये 'फैसला’

25 Sep 2025 12:11:04
अनिल कांबळे
 
 
नागपूर,
sanjay puri rapist नागपूर जिल्ह्यातील लिंगा गावात राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणारा आणि तिला दगडाने ठेचून ठार मारणारा नराधम संजय पुरी (37) याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामाेर्तब करण्यासाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली हाेती. या याचिकेवर येत्या 6 ऑक्टाेबरपासून अंतिम सुनावणी केली जाणार आहे.
 

sanjay puri rapist 
ही अंतिम sanjay puri rapist सुनावणी न्या. अनिल पानसरे व न्या. सिद्धेश्वर ठाेंबरे यांच्या न्यायपीठासमक्ष हाेईल. त्यावेळी आराेपीला नागपूर मध्यवर्ती कारागृहामधून ऑनलाइन पद्धतीने हजर ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सरकारच्यावतीने अ‍ॅड. संजय डाेईफोडे तर, आराेपीकडून अ‍ॅड. रस्ताेगी बाजू मांडणार आहेत. ही घटना कळमेश्वर तालुक्यामधील लिंगा गावात 6 डिसेंबर 2019 राेजी घडली. लिंगा गाव एका शेतामुळे दाेन वस्तीत विभागले गेले आहे. पीडित चिमुकली गावाच्या एका भागात आईवडिलांसह राहत हाेती तर, दुसèया भागात तिच्या आजीचे घर हाेते. 6 डिसेंबर 2019 राेजी सायंकाळी 5 च्या सुमारास ती शेत ओलांडून आजीच्या घरी जात हाेती. दरम्यान, पुरीने तिला उचलून शेताच्या आतमध्ये नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आपले पाप उघडकीस येऊ नये म्हणून मुलीची दगडाने ठेचून हत्या केली.
Powered By Sangraha 9.0