मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देवांचा हात; ५१ हजाराची मदत

25 Sep 2025 21:26:30
वर्धा, 
wardha-cm-relief-fund : महाराष्ट्रात अति पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत भाजपाचे वर्धा जिल्हा माजी महामंत्री अविनाश देव यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांना दिला.
 
 
 
sdf
 
 
 
भारतीय जनता पार्टी विदर्भ विभागाची स्थानिक स्वराज्य संस्था व नागपूर विभागाच्या नागपूर येथे झालेल्या पदवीधर निवडणुकीत हा निधी देण्यात आला. बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा वर्धेचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे तसेच विदर्भातील आमदार, विदर्भातील प्रमुख मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
विदर्भ-कोकणपर्यंत पावसाने थैमान घातले. पुन्हा महाराष्ट्रात पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. शेतकरी सरकारकडून मदत मिळेल यासाठी वाट पाहतो आहे. व्यापारी, उद्योजक, सरकारी कर्मचार्‍यांनी पुढे येऊन मदत करण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकर्‍यांना संकटातून बाहेर काढेलच. परंतु, आपणही देणे लागतो या शिकवणीतून आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीत राज्य सरकारला ५१ हजार रुपयांचा धनादेश देत आहे, असे अविनाश देव यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0