बळीराजासाठी पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री फडणवीस याची भेट

26 Sep 2025 15:45:01
नवी दिल्ली,
Devendra Fadnavis PM Narendra Modi meeting महाराष्ट्रात अलीकडेच झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. हातावरचा तोंडाचा गव्हा निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराज्याचा अधोगतीचा मार्ग सुरू झाला असून, शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि तब्बल एक तास या बैठकीत महाराष्ट्रातील पावसामुळे झालेल्या ताज्या परिस्थितीवर चर्चा झाली.
 

Devendra Fadnavis PM Narendra Modi meeting 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांना राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या संकटाची सविस्तर माहिती दिली. याआधीही त्यांनी गृहमंत्र्यांना निवेदन दिले होते ज्यामध्ये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन पूरग्रस्त भागातील मदतीसाठी विशेष मागणी केली गेली आहे.
 
 
राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या जीवित आणि वित्तहानीवर मात करण्यासाठी सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी केवळ एनडीआरएफचे निकष नव्हेत तर केंद्राकडून अतिरिक्त मदत देणे आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
 
 
पंतप्रधान मोदींसोबत Devendra Fadnavis PM Narendra Modi meeting झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, “मी पंतप्रधानांना महाराष्ट्रातील सध्याच्या पूरस्थितीचा सविस्तर आढावा दिला आहे. माझ्या वतीने आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सही असलेले निवेदनही त्यांनी घेतले आहे. पंतप्रधानांनी मदतीसाठी आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले की, लवकरात लवकर तुमचा प्रस्ताव पाठवा, तो आला की आम्ही त्यावर तत्परतेने कारवाई करू. शक्य तितकी मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू.”आता केंद्र सरकारकडून लवकरच महाराष्ट्रात नुकसान पाहणीसाठी एक पथक पाठवण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरोधकांनी राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना किमान प्रती हेक्टर ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.महाराष्ट्रातील शेतकरी संकटातून बाहेर येण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या समन्वयातून वेगवान मदत देण्याचे काम सुरू असून, पावसामुळे झालेल्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0