बियाणे नकली निघाले : शेतकर्‍याची फसवणूक

26 Sep 2025 20:19:34
कापसाला बोंडच : शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान
आर्णी, 
Fake seeds: Farmers cheated शेतकर्‍यांचे संकट काही संपतच नाही. आधी अतिवृष्टीने कंबरडे मोडले, आता कापसाच्या शेतात बोगस बियाण्यांनी शेतकर्‍यांना अक्षरशः रडवणे सुरू केले आहे. तालुक्यातील सुकळी येथील आपल्या ५ एकर शेतात गजानन या शेतकर्‍याने कापूस पिकाची लागवड केली. परंतु यंदा पेरलेल्या कापसाच्या एकाही झाडाला बोंड लागले नसून, बियाणे बोगस निघाल्याने शेतकर्‍याची फसवणूक झाली. त्यामुळे त्याचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन मानसिक शारीरिक त्रास सहन करून तो अडचणीत सापडला आहे.
 
 
fake-seeds
 
या कापूस झाडांना पात्या येतात आणि काही दिवसांनी गळून जातात. Fake seeds: Farmers cheated  यामुळे शेतकरी गजानन यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. परिश्रम, खते, औषधे आणि मजुरीसाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या गजानन शेळके या शेतकर्‍याने आर्णी तालुका कृषी अधिकार्‍यांकडे याबाबत लेखी तक‘ार दाखल केली आहे. तत्काळ चौकशी करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. बाजारात बोगस बियाणे विक‘ीस मोकळीक मिळाल्यामुळे शेतकर्‍यांचा मोठा आणि मानसिक छळ होत आहे. दरवर्षी कृषी विभागाकडून नियंत्रणाचे आश्वासन दिले जाते, पण प्रत्यक्षात मात्र लाखोंच्या किंमतीचे शेत उद्ध्वस्त होऊन शेतकरी अधिकाधिक संकटात सापडत आहेत. शेतकर्‍यांच्या या परिस्थितीकडे सरकार, कृषी विभाग  आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष घालून तत्काळ नुकसानभरपाई द्यावी आणि बोगस बियाणे निर्माते व विक‘ेत्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी शेतकर्‍याने आपल्या तक‘ारीत केली आहे.
अहवालानुसार कारवाई
गजानन शेळके या शेतकर्‍याची तक्रार प्राप्त झालेली आहे. जिल्हास्तरीय कापूस तक्रार निवारण समितीद्वारे शास्त्रीय तपासणी करून निष्कर्ष अहवाल दिल्या जाईल आणि त्यानुसार कार्यवाही आणि कारवाई होईल.
नरेंद्र राठोड,
कृषी अधिकारी गुण नियंत्रण, आर्णी.
Powered By Sangraha 9.0