महाराष्ट्रात 27 ते 29 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; ऑरेंज अलर्ट जारी

26 Sep 2025 13:01:32
मुंबई,
heavy-rain-warning-in-maharashtra महाराष्ट्रात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. कमी दाबाच्या क्षेत्राच्या (एलपीए) प्रभावामुळे मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने शुक्रवारी धुळे, नंदुरबार आणि जळगाव वगळता संपूर्ण महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट दिला असून, शनिवारी 11 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.

heavy-rain-warning-in-maharashtra
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 25 सप्टेंबरपासून विदर्भात मुसळधार पावसाचे नोंदी आहेत, तर 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 सप्टेंबर रोजी मराठवाडा आणि 27 व 28 सप्टेंबर रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. heavy-rain-warning-in-maharashtra आयएमडीच्या माहितीनुसार, 27 व 28 सप्टेंबरला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी 210 मिमीपेक्षा जास्त अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 25 सप्टेंबर रोजी विदर्भात, तसेच 27 व 29 सप्टेंबरला मध्य महाराष्ट्र, कोकण व मराठवाड्यात 120-200 मिमीपर्यंत खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील पाच दिवसांत विदर्भात 30-50 किमी प्रतितास वेगाने वारे व वादळे जाणवण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0