महावितरण पुसद उपविभागाचे शहर आणि ग्रामीण विभाजन

26 Sep 2025 20:35:43
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्याला यश

पुसद, 
Mahavitaran Pusad पुसद तालुका हा लोकसं‘येच्या दृष्टीने मोठा असून वाढत्या लोकसं‘येमुळे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे व ग्राहकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करणे हे महावितरणसमोर मोठे आव्हान होते. त्यामुळे पुसद उपविभागाचे विभाजन व्हावे, अशी मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. ही मागणी पूर्ण करण्यासाठी नागरिक राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्याकडे पाठपुरावा करत होते. राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर इंद्रनील नाईक यांनी या प्रश्नाचा गांभीर्याने पाठपुरावा केला आणि अवघ्या दहा महिन्यांच्या काळात या मागणीला मूर्त रूप देत महावितरण पुसद उपविभागाचे विभाजन करण्यात यश मिळविले.
 
 
indraneel
 
Mahavitaran Pusad या निर्णयानुसार पुसद शहर उपविभाग आणि पुसद ग्रामीण उपविभाग अशी दोन स्वतंत्र कार्यालये स्थापन आली आहेत. पुसद ग्रामीण उपविभागात पुसद ग्रामीण क्रमांक १, पुसद ग्रामीण क‘मांक २, जांबबाजार, खंडाळा व शेंबाळपिंप्री या शाखांचा समावेश करण्यात आला आहे. तर पुसद शहर उपविभागात पुसद शहर वितरण केंद्र १, २, ३ व घाटोडी शाखा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या नव्या कार्यालयांच्या स्थापनेसाठी महावितरणकडून आवश्यक ती आर्थिक करण्यात आली आहे. पुसद ग्रामीण उपविभागासाठी १२ नवीन पदांची निर्मिती करून १,२६,७३,०९२ रुपये वार्षिक आर्थिक भार तसेच प्रशासकीय खर्चासाठी ९,३५,००० रुपये निधी मंजूर झाला आहे.
 
 
त्याचप्रमाणे पुसद शाखा कार्यालयासाठी ९ नवीन पदांची निर्मिती करून ८२,७९,०६४ रुपये इतका वार्षिक आर्थिक भार आणि प्रशासकीय खर्चासाठी १,४०,००० रुपये इतका निधी मंजूर करण्यात आहे. Mahavitaran Pusad पुसद उपविभागाचे विभाजन झाल्यामुळे आता शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या वीजेसंबंधी तक्रारींना अधिक जलद व कार्यक्षम सेवा मिळणार असून या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधान व आनंद व्यक्त होत आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे पुसद तालुक्यातील जनतेच्या अपेक्षांना न्याय मिळाला आहे.
जनतेला फायदाच
पुसद उपविभागाचे झाल्याने आता नवीन कार्यालयाची निर्मिती होणार आहे. नवीन पदभरती होईल ज्यामुळे ग्राहकांच्या समस्या तत्काळ मार्गी लागतील.
इंद्रनील नाईक, राज्यमंत्री
Powered By Sangraha 9.0