पुसद,
‘Svacchata hl seva ’ ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत बुधवार, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत दररोज विविध कार्यक‘मांचे आयोजन ग्रामस्तरावर करण्यात येत आहे. २५ सप्टेंबर रोजी महाश्रमदानाचा उपक्रम सर्वत्र राबविण्यात आला. या अनुषंगाने पाणी व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रोदळ यांनी पुसद तालुक्यातील वालतूर तांबडे, चोंढी, बान्सी या गावांत महाश्रमदान कार्यक्रमात सहभागी होऊन श्रमदान केले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांना वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता या विषयावर त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. गावाच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता अतिशय महत्त्वाची असल्याचे अतिरिक्त अभियान संचालक शेखर रोंदळ यांनी आपल्या मनोगतात प्रतिपादन केले. महाश्रमदान कार्यक्रमामध्ये मोठ्या सं‘येने गावांतील महिला, पुरुष व मुलांनीही सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला अतिरिक्त अभियान संचालक शेखर रोंदळ आणि राज्य माहिती शिक्षण संवाद तज्ञ आशिष थोरात उपस्थित होते. तीनही गावातील उपसरपंच, ग्राप सदस्य, ग्रामसेवक, शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
‘Svacchata hl seva ’ या कार्यक्रमाला जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर, सर्व जिल्हा सल्लागार, पंचायत समिती गटविकास अधिकारी अमोल अंडेलवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय राठोड, विस्तार अधिकारी सर्व, तालुक्यातील स्वच्छता कक्षांचे सर्व उपस्थित होते. या सोबतच अतिरिक्त अभियान संचालक रोंदळ यांनी ‘एक पेड मां के नाम’ अंतर्गत तिन्ही गावांत वृक्षारोपण केले. तसेच ‘घरकुल तिथे शोषखड्डा’ अंतर्गत शोषखड्ड्याचे भूमिपूजन सुद्धा केले. या कार्यक‘मासाठी गावकरी, तालुक्यातील स्वच्छता कक्ष आणि जिल्हा स्वच्छता कक्षातील कर्मचारी अधिकारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक‘मासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.