उद्या बाल-शिशु स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव

27 Sep 2025 22:42:33
नागपूर,
Bal-Shishu Swayamsevak : रा. स्व. संघाच्या बाल व शिशु स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उद्या रविवारी 28 सप्टेंबरला अजनी, अयोध्या, नंदनवन, इतवारी, गिट्टीखदान, धरमपेठ, त्रिमूर्ती, सोमलवाडा, मोहिते भागात होईल. अजनी भागाचा उत्सव सायंकाळी 5 वाजता स्वराजनगर मैदानात युवा फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. कुणाल पडोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
 
 
 rss
 
 
अयोध्या भागाचा उत्सव चक्रधरनगर बास्केटबॉल मैदानात श्री स्वामी समर्थ मठाजवळ आंतरराष्ट्रीय जलतरण प्रशिक्षक व क्रीडा शिक्षक आनंद भोसले यांच्या उपस्थितीत सायंकाळी 5.20 वाजता होईल. नंदनवन भागाचा उत्सव कमला नेहरू महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. डॉ. दत्तात्रेय वझरकर यांच्या उपस्थितीत आयुर्वेदिक ले-आऊट, मनपा मैदानात सायंकाळी 5 वाजता होईल.
 
 
इतवारी भागाचा उत्सव भारत उद्योग भवन संचालक अशोक त्रिवेदी यांच्या उपस्थितीत हंसापुरीमधील छोटी खदान मैदानात सायंकाळी 6.10 वाजता होईल. गिट्टीखदान भागाचा उत्सव उद्योजक अंशुल खंडेलवाल यांच्या उपस्थितीत आकारनगर मैदानातील निसर्ग लॉनमध्ये सायंकाळी 5 वाजता होईल.
 
 
धरमपेठ भागाचा उत्सव नौदलाचे निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल किशोर ठाकरे यांच्या उपस्थितीत सीताबर्डीवरील सेवासदन शाळेच्या मैदानात सायंकाळी 5 वाजता होईल. त्रिमूर्ती भागाचा उत्सव सॉफ्टसेन्स टेक्नोसॅर्व्हे इंडियाचे संचालक विशाल लिचडे यांच्या उपस्थितीत विद्या विहार शाखा मैदानात सायंकाळी 5.30 वाजता होईल. त्यापूर्वी 4.30 वाजता पथसंचलन निघेल.
 
 
सोमलवाडा भागाचा उत्सव संस्थापक, तारा एंटरप्राइजेस, स्पीक अँड स्पॅन सर्व्हिसचे संस्थापक शशिकांत मानापुरे यांच्या उपस्थितीत सुरेन्द्रनगर बास्केटबॉल मैदानावर सायंकाळी 5.30 वाजता होईल. त्यापूर्वी 4.30 वाजता पथसंचलन निघेल.
मोहिते भागाचा उत्सव कच्छ पाटीदार समाजाचे महामंत्री शांतीलाल पटेल यांच्या उपस्थितीत गरोबा मैदानात (सिद्धेश्वर पार्क) सायंकाळी 5 वाजता होईल.
Powered By Sangraha 9.0