दिवाळी पुर्वी शेतकर्‍यांना नुकसान भरपाईची रक्कम देण्याची ग्वाही

27 Sep 2025 22:23:03
बुलढाणा, 
Prataprao Jadhav : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राची पाहणी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी पाऊस सुरू असतानाही शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन केली. नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शासनाला सादर करा असे निर्देश प्रशासनाला दिले तर दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होईल नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे असा विश्वासही त्यांनी शेतकर्‍यांना दिला.
 
 
kl
 
 
दि. २७ सष्टेबर रोजी सिंदखेडराजा तालुयातील वर्दडी फाटा,बोराखडी गंडे,चांगेफळ देवखेड रुम्हणा शिवारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा केंद्रीय आयुष आरोग्य कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला. सकाळपासूनच या परिसरामध्ये पाऊस सुरू असतानाही त्यांनी अंगात रेनकोट घालून ते शेतकर्‍यांच्या बांधावर गेले. नुकसानीची पाहणी केली व प्रशासनाला तात्काळ पंचनाम्ये करण्याचे निर्देश दिलेत. आणि शेतकरी बांधवांशी संवाद साधला. आलेल्या नैसर्गिक संकटाला आपण सर्वच सामोरे जावु, सरकार तुमच्या पाठीशी आहे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून मदत मिळावी यादृष्टीकोणातून शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगुण दिवाळीपूर्वी शेतकर्‍यांना नुकसानीची भरपाई त्यांच्या खात्यात जमा होईल अशी ग्वाही त्यांनी शेतकर्‍यांना दिली. यावेळी माजी आ. डॉ.शंशिकांत खेडेकर, माजी आ. तोताराम कायंदे यांच्यासह शिवसेना, युवासेना महायुतीचे पदाधिकारीमहसूल,कृषी,गटविकास अधिकारी अन्य विविध विभागाचे अधिकारी,शेतकरी बांधव उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0