हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात अंधारात

27 Sep 2025 12:18:28
हिंगणघाट,
hinganghat hospital crisis हिंगणघाट शहरात झालेल्या तुफान पावसाने उपजिल्हा रुग्णालयातील भीषण वास्तव्य चहाट्यावर आले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधार पसरला होता. गरोदर महिला, प्रसुती झालेल्या महिला, नवजात बालक अंधारात असून श्वास घेण्यास देखील त्रास होत असल्याची परस्थिती रुग्णालयात आहे. उपजिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाकडून रडत रडत आपली परिस्थिती सांगून अतुल वांदिले यांना रुग्णालयात येण्यासाठी विनंती केली.
 

hinganghat hospital crisis 
रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णालयाची परिस्थिती अतिशय गंभीर होती ही परिस्थिती बघून अतुल वांदिले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जनरेटर बोलावून घेतले.. यावेळी रुग्णालयात ठिय्या मांडून राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांच्यासह सुनील डोंगरे, मोहम्मद रफिक, बालू वानखेडे, अमोल बोरकर दशरथ ठाकरे श्रीकांत भगत व अनेक नागरिकांनी आंदोलन केले. रुग्णालयात डॉक्टर पोलीस घेऊन आले अशी पहिली घटना हिंगणघाट शहरातील नागरिकांना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाली. रुग्णालयातील स्वच्छतागृहामध्ये माकोडे होते. सर्वत्र घाण पसरली होती व अंधार होता रुग्णांची बेहाल होते नातेवाईक परेशान होते. रुग्णालयात वीज नसतानाही जनरेटरची सुविधा उपलब्ध नाही, तसेच पाण्याची सोयही ठप्प असल्याने रुग्णालयातील मूलभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या.
 
 
रुग्णालयाच्या वार्डमध्ये रुग्ण अंधारात बसलेले असताना अधिकारी मात्र उजेडात काम करताना दिसून आले. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, रुग्णालय परिसरात अस्वच्छता व झाडांवरील माकोड्यांचा त्रास अधिक प्रमाणात असल्याने रुग्णांच्या आरोग्याला अतिरिक्त धोका निर्माण झाला आहे.या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपजिल्हा रुग्णालयाला धाड टाकून पाहणी केली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर कडाडून टीका केली.
 
 
स्थानिक नागरिकांनीदेखील या प्रकारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “आम्ही रुग्णालयात उपचारासाठी आलो, पण इथेच स्वतः आमचा जीव धोक्यात आहे. जनरेटर, पाणी आणि मूलभूत सुविधा नसेल तर हे रुग्णालय कसले?” असा सवाल नागरिकांनी केला.
Powered By Sangraha 9.0