निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी हतबल

27 Sep 2025 21:10:22
वाशीम, 
washim-news : जिल्ह्यात २६ सप्टेंबर पासून सर्वधूर मुसळधार पावसाने चांगलाच जोर धरल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिक हातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे. कापणीला आलेले सोयाबीनच्या शेंगाला सततच्या पावसाने अंकुर निघण्याची भिती निर्माण झाली आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
 
 
 
jk
 
 
 
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुरु झालेला पाऊस २७ सप्टेंबर रोजी दिवसभर कुठे ना कुठे मुसळधार कोसळला. ऑगस्ट महिन्यात आलेल्या पावसाने अर्धा अधिक खरीप हंगाम हातून गेला. शेत जमिनी खरडून गेल्या. सप्टेंबर महिन्यातही सुरुवातीला आणि आता शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने उसरला सुरला खरीप हंगाम हातून जाण्याची शयता आहे.
 
 
अनेक शेतकर्‍यांचे शेतातील सोयाबीन कापणीला आले आहे. मात्र, सतत पाऊस सुरु असल्याने कापणी खोळंबली आहे. त्यामुळे त्यातील शेंगांना अंकुर निघण्याची भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट होवून शेतकर्‍यांचा लागवडीचा खर्चही वसूल होणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यात शेतमालाला भावही नाही, त्यामुळे शेतकरी कोंडीत सापडला आहे. शासनाने वाशीम जिल्ह्यातील १४५ कोटी रुपये मदत जाहीर केली. त्यातून हेटरी ८५०० रुपये मदत देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांचे नुकसान पाहता आणि शासनाने जाहीर केलेली मदत पाहता शेतकर्‍यांच्या लागवडीचा खर्चही वसूल होणे अवघड आहे.
 
प्रशासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार २६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत वाशीम तालुयात ४३.०१ मिमी, रिसोड, २३.०२ मिमी, मालेगाव ४५.०४ मिमी, मंगरुळनाथ ५०.०१ मिमी, मानोरा, ४०.०० मिमी, कारंजा तालुयात ५९.०२ मिमी पावसाची नोंद झाली. वाशीम जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्याने शेतात पाणी साचले होते. नदी, नाल्या पूर आला होता. २७ सप्टेंबर रोजी दिवसभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरुच होता.
Powered By Sangraha 9.0