नागरिकांच्या प्रलंबित पट्टे वाटपाचा प्रश्न मार्गी

27 Sep 2025 21:45:51
पुलगाव,
Rajesh Bakane : येथील हिंगणघाट फैल व इंदिरानगर प्रभागातील नागरिकांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पट्टे वाटपाचा प्रश्न मार्गी लागला असून, पुलगाव नगरपरिषदेत सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत नागरिकांना पट्टे वाटप करण्यात आले.
 

jkl 
 
 
अध्यक्षस्थानी आमदार राजेश बकाने होते तर प्रमुख अतिथी म्हणून नपचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार आश्रमा, अपर तहसीलदार स्नेहा क्षीरसागर, राहुल चोपडा, प्रशांत इंगोले, किशोर गव्हाळकर, अरविंद नागतोडे, नितीन बडगे, माधुरी इंगळे, सुमित सिद्धानी, आशिष गांधी, भरत नागपाल, मधुकर रेवतकर, सुरेश सुखीजा, गजानन गालपेलीवार, अली असगर सैफी, अविनाश मांजरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
 
 
नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच पट्टे वाटपाच्या प्रश्नावर प्रत्यक्ष नागरिकांकडून अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांच्या हकाच्या या मागणीला गती मिळाली आहे. या उपक्रमामुळे हजारो नागरिकांना कायदेशीर हकाचे पट्टे मिळून त्यांचे घरकुल सुरक्षित होणार आहे. याप्रसंगी आमदार राजेश बकाने यांनी नागरिकांशी संवाद साधला. शासन, प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या समन्वयातून नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे हेच आपले ध्येय आहे. नागरिकांच्या पट्टे वाटपाचे प्रश्न आपण वैयतिकरित्या पाठपुरावा करून मार्गी लावत असून लवकरच याचे वितरण होणार आहे, असेही आ. बकाने म्हणाले.
Powered By Sangraha 9.0