पाऊस उठला शेतकऱ्यांच्या मुळावर!

27 Sep 2025 10:54:36
तुमसर, 
farmer-loss-in-tumsar परतीच्या म्हणणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा आपले रौद्ररूप दाखवित शेतकऱ्यांना चिंतेत टाकले आहे. सलग दुसऱ्या दिवशी मोहाडी आणि तुमसर तालुक्यात पडलेल्या पावसापुढे धान पिकाने अक्षरशः नांगी टाकली. हजारो एकर शेतातील धान कापणीच्या अवघ्या काही दिवस आधी लोळल्याने शेतकऱ्यांचे डोके सुन्न झाले आहे.
 
 
farmer-loss-in-tumsar
 
मागील दोन दिवसांपासून रात्रीच्या सुमारास पडणारा पाऊस मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे दिसते. 25 च्या रात्री पडलेल्या पावसाने नुकसान केले असतानाच समाधान न झाल्यागत 26 च्या रात्री पुन्हा पाऊस कोसळला. देव्हाडा, नवेगाव, जांभळापानी, करडी, नीलज या भागात प्रचंड वेगाने संततधार मोठ्या थेंबाच्या पडलेला पाऊसाने धान पीक लोळविले. farmer-loss-in-tumsar दोन चार दिवसात कापणीला आलेले पीक सकाळी जमिनीवर पाण्यात पोहताना पाहून शेतकऱ्यांचा जीव व्याकुळ झाल्या शिवाय राहिला नसेल. पडलेले पीक पाहून शेतकऱ्यांच्या डोक्यातून गळणारे आसवे बरेच काही सांगून जात होते. सलग दोन दिवस आलेले हे संकट हलक्या आणि भारी म्हणजे अधिक दिवसाच्या धानालाही बाधा पोहचवून गवले, हे तेवढेच खरे. हजारो एकरात झालेले हे नुकसान आता प्रशासनाच्या सर्वेक्षणात किती प्रमाणात येते, यावर शेतकऱ्यांना मिळणारी मदत ठरेल.
Powered By Sangraha 9.0