महाराष्ट्र : ७२ तासांचा हाय अलर्ट; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट
28 Sep 2025 09:57:17
मुंबई,
red-alert-for-maharashtra भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी मोठा इशारा दिला असून, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी पुढील ७२ तास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात अति मुसळधार पावसासह सतत पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये तीव्र हवामानाची शक्यता असून, सिंधुदुर्ग व नाशिकच्या घाट भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. red-alert-for-maharashtra मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.