राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी तिजोरी उघडून मदत करावी : अनिल देशमुख

28 Sep 2025 19:39:55
तभा वृत्तसेवा
उमरखेड,
Anil Deshmukh राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीमधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने योग्य पाऊल उचलले नाही तर गावोगावी शेतकरी आत्महत्या करतील. त्यामुळे शेतकरी कर्जमाफी करून राज्य शासनाने तिजोरी उघडून शेतकèयांना मदत करावी, तोपर्यंत आत्महत्या थांबणार नसल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले.
 

Anil Deshmukh 
शनिवारी उमरखेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानाची पाहणी केल्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते म्हणाले, राज्य सरकारकडून देण्यात येणारी मदत ही अतिशय कमी आहे. शेतकèयांना पुन्हा उभे करायचे असेल तर त्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने पंजाब राज्याने तेथील शेतकèयांना हेक्टरी 50 हजार रुपयाची मदत जाहीर केली त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारनेसुद्धा नुकसानग्रस्त शेतकèयांना 50 हजार रुपये प्रती हेक्टर मदत जाहीर करावी.
 
 
राज्यात मविआ सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकèयांची कर्जमाफी केली होती. आमची सत्ता आली तर शेतकèयांचे संपूर्ण कर्ज माफ करू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2024 च्या विधानसभेच्या प्रचाराच्या जाहीर सभेत दिले होते.
सततच्या नापिकीमुळे आणि आर्थिक अडचणीमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. परंतु केंद्र आणि राज्य सरकार या गंभीर बाबीकडे लक्ष देत नाही. राज्य सरकारने शेतकèयांच्या तोडाला नेहमीच पाने पुसण्याचे काम केले आहे, असे ते म्हणाले. चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे कापूस व सोयाबीनचे भाव पडले आहेत. कापड तयार करणाèया कारखानदारांना फायदा व्हावा म्हणून 19 ऑगस्ट 2025 पासून कापसावरील 11 टक्के आयात कर माफ करून मोठ्या प्रमाणात विदेशातून कापूस आयात करण्यात येत आहे. आता तर या आयातीला वाढीव मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे.
सोयापेंडच्या निर्यातीवर सोयाबीनचा भाव ठरत असतो. ही सोयापेंड मोठ्या प्रमाणात निर्यात करण्याचे सोडून केंद्र सरकार सोयाबीन तेलाची आयात करीत आहे. दुसरीकडे नुकसान होऊनही मदत मिळत नाही. पीकविम्याच्या नियमांत बदल करण्यात आल्याचाही फटका शेतकèयांना बसत असून विमा कंपन्या मात्र मालामाल होत असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.
यावेळी उमरखेड विधानसभा अध्यक्ष राजू जयस्वाल, नलिनी ठाकरे, बाबासाहेब गाडे, भावना लेंढे, अशोक राऊत, संकेत टोणे, स्वप्नील कनवाळे, साजीद जहागीरदार, इसा राज, भास्कर पंडागळे उपस्थित होते
सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प होऊ देणार नाही
ज्या गावात नुकसानाची पाहणी करण्याकरिता गेलो असता तेथील गावकèयांचा सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात विरोध होत असून शेतकरी याबाबत अत्यंत संतप्त असल्याने कुठल्याही परिस्थितीत सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प होऊ देणार नसल्याचे यावेळी अनिल देशमुख यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0