'मैंने बॉयफ्रेंड की हत्या कर दी... लाश कमरे में पड़ी है'

28 Sep 2025 12:48:31
बिहार,
Kankarbagh murder case राजधानी पाटण्यातील कंकडबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराचा सिलबट्ट्याने ठार मारून नंतर त्याच्या डोक्यावर पाण्याने भरलेला घडा फेकला. या घटनेनंतर आरोपी महिलेने स्वतः पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली.
 

बिहार, Kankarbagh murder case 
मृत व्यक्तीची ओळख मुरारी कुमार (वय अंदाजे ३५) या नावाने झाली असून तो मूळचा पाटण्याच्या मसौढी भागातील असून, गेल्या काही वर्षांपासून बंगळुरूमध्ये चालकाची नोकरी करत होता. तो १६ सप्टेंबर रोजी पाटण्यात आला होता. त्याची पाच वर्षांपासून पूजा नावाच्या विवाहित महिलेसोबत जवळीक होती. पूजा आपल्या पतीपासून विभक्त असून ती मे २०२४ पासून कंकडबाग परिसरात आपल्या मुलीसह भाड्याच्या घरात राहत होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा आणि मुरारी यांच्यात विवाहाबाबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. पूजा सातत्याने मुरारीकडे विवाहासाठी आग्रह करत होती. मात्र, यंदाच्या दसऱ्याच्या सणात जेव्हा पूजाने विवाहाची ठोस मागणी केली, तेव्हा मुरारीने टाळाटाळ केली. यामुळे दोघांमध्ये वाद झाला.
 
 
घटनेच्या रात्री मुरारी झोपेत असताना पूजाने रागाच्या भरात त्याच्या डोक्यावर जोरदारपणे सिलबट्टा फेकला. यानंतर तिने पाण्याने भरलेला घडा देखील त्याच्या डोक्यावर आपटला. या हल्ल्यामुळे मुरारीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पूजा बराच वेळ मृतदेहाजवळ बसून राहिली. त्यानंतर तिने स्वतः कंकडबाग पोलीस ठाण्यात फोन करून सांगितले, “मी माझ्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. लाश घरातच आहे. तुम्ही या.”
 
 
पोलिसांनी Kankarbagh murder case  तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी पूजाला अटक करण्यात आली असून तिच्या विरोधात खूनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत पूजाने हत्या केल्याची कबुली दिली असून, तिने स्पष्टपणे सांगितले की मुरारी गेली चार वर्षे लग्नाचं आश्वासन देत होता, मात्र वारंवार टाळाटाळ करत होता.दरम्यान, मुरारीच्या कुटुंबीयांनी या घटनेमागे आर्थिक व मालमत्तेचा वाद असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुरारीचा भाऊ मनोज यादव, जो पाटण्यात पूर्वी नगरसेवक होता, याने सांगितले की मुरारी मसौढी येथे जमीन खरेदी करण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याने आपल्या बहिणीकडून एक लाख रुपये मागितले होते. हीच बाब पूजा आणि मुरारी यांच्यातील वादाचे मूळ कारण ठरली असावी, असेही मनोज यादव यांचे म्हणणे आहे. पूजाला ती जमीन आपल्या नावावर हवी होती, मात्र मुरारी त्यास तयार नव्हता.मकानमालक आणि परिसरातील इतर भाडेकरूंनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, पूजा स्वतःला पतीपासून विभक्त झालेली म्हणून ओळखवत होती. मुरारी काही वेळा घरी येत असे, पण त्यांच्या संबंधांबाबत कोणीही संशय घेत नव्हता.
 
 
कंकडबाग पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. तपासात अजून काही आर्थिक बाबी व अन्य व्यक्तींचा संबंध उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Powered By Sangraha 9.0