ठरलं... बळीराजाला लवकरच मदत

28 Sep 2025 12:38:41
तभा वृत्तसेवा मारेगाव,
Ashok Uike तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकèयांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी गुरुवार, 25 सप्टेंबरला तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन पीक नुकसानीची पाहणी केली. दुपारी 1 वाजता बोटोनी येथील शेतकरी मारोती वखनोर यांच्या शेतात त्यांनी सर्वप्रथम पाहणी केली. त्यानंतर करणवाडी येथील शेतकरी श्रीधर काळे यांच्या रोडलगतच्या शेतात झालेल्या नुकसानीची तपासणी केली.
 

Ashok Uike 
यावेळी शेतकèयांशी संवाद साधताना डॉ. उईके म्हणाले, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकèयांना लवकरात लवकर योग्य तो मोबदला दिला जाईल. शेतकèयांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे, असे त्यांनी आश्वासन दिले.
या दौèयात वणी Ashok Uike येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड, मारेगावचे गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, मंडळ कृषीअधिकारी बुटले, मारेगाव मंडळ कृषीअधिकारी किशोर डोंगरकर, ठाणेदार श्याम वानखेडे, सरपंच विमल उरकुडे, ग्रामसेवक काकडे, रजनीकांत पाटील, अतुल सरोदे, कृषी सहायक विनायक जुमनाके, कृषी सहायक ज्ञानेश्वर गाडगे, तलाठी प्रवीण उपाध्ये, पिंपळकर, प्रदीप उंबरे, मनोज वादाफळे, शशिकांत बोडे, उपेंद्र गायकवाड, तुळशीराम बोबडे, शैलेश जीवतोडे तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0