कारंजा लाड,
redressal camp तालुयात श्री छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान पंधरवाडा अभियानांतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रम कारंजा तालुयात ४ मंडळ ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे.कारंजा तहसील कार्यालय, खेर्डा बु. ग्रामपंचायत कार्यालय, धनज बु., तेलीपुरा गुल्हाने हॉल येथे या ठिकाणी शेतकरी संवाद मध्ये शेत रस्त्याबाबत व शेतीच्या नाल्या व सतत अति पावसामुळे नुकसान झाल्याबाबत तक्रारी प्राप्त व संवाद साधण्यात आला. यामध्ये कारंजा येथे तहसीलदार कुणाल झाल्टे यांचे अध्यक्षतेखाली शेतकरी संवाद घेण्यात आला. यावेळी निवासी नायब तहसीलदार अनिल वाडेकर, मंडळ अधिकारी महेश धानोरकर, तलाठी राहुल वर्घट, अर्चना चिकटे मंडळातील तलाठी, भूमी अभिलेख कार्यालय प्रतिनिधी नागरिक उपस्थित होते. शिबिरामध्ये १३ तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी ३ तक्रारी निपटारा करण्यात आला व उर्वरित संबंधित विभागांना पत्र देण्यात आले.
खेर्डा बु.मंडळामध्ये शेतकर्यांच्या रस्त्याबाबत सतत पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत पंचनामा करण्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण ३ तक्रारी मध्ये १ तक्रार निकाली काढण्यात आली व उर्वरित तक्रारीबाबत वरिष्ठांना व इतर विभागांना कळविण्यात आले. धनंज बु.मंडळामध्ये ४ तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी २ निकाली काढण्यात आल्या. कारंजा तालुयात ४ मंडळ ठिकाणी शेतकरी संवाद आयोजित करण्यात आला. यामध्ये २३ तक्रारी प्राप्त झाल्या त्यापैकी ७ तक्रारी जागेवर निपटारा करण्यात आला उर्वरित संबंधित विभागांना कळविण्यात आले.