राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथक संचालन पूर्व निवड चाचणी शिबिर

28 Sep 2025 16:34:17
वर्धा,
NSS pre-selection camp महाराष्ट्रातील विविध विभागांमधील १६ विद्यार्थी व ३ कार्यक्रम अधिकारी हे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) तर्फे आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथक संचालनाच्या पूर्व निवड चाचणी शिबिरात सहभागी झाले आहेत. या संघाचे नेतृत्त्व शिक्षण संचालनालय पुणे तर्फे रासेयो +२ स्तर सहाय्यक विभागीय समन्वयक तथा जिल्हा समन्वयक प्रा. रवींद्र गुजरकर यांच्या नेतृत्वात होत असून, या शिबिरासाठी कोल्हापूर विभागाचे प्रा. धर्मराज राऊत व मुंबई विभागाच्या डॉ. भारती तोरणे, नागपूर विभागाचे जिल्हा समन्वयक प्रा. विवेक देशमुख, कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन कापगते व प्रा. किशोर धांदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
 

 Maharashtra NSS pre-selection camp 
या शिबिरात मुलींमध्ये लातूरची साक्षी गोरे, मुंबईच्या आयुषी झा व विद्या राज, नागपूरच्या हर्षदा केवटे व अक्षरा माथरे, कोल्हापूरच्या आदिती पत्की व साक्षी पाटील, नाशिकची नंदिनी धात्रक तर अमरावतीची सोनम चव्हाण यांचा समावेश आहे. मुलांमध्ये नाशिकचा प्रथमेश आहेर, अमरावतीचा पियुष हूरकुंडे, मुंबईचा भूषण राजभोज व प्रसाद तुपे, लातूरचा संजय जाधव, नागपूरचे यश साटोणे व विशाल बनसोड यांची निवड झाली आहे. या शिबिरामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षणाकरिता संधी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती, संचलन कौशल्य व शिस्त यांचा कस या शिबिरात पाहिला जात आहे.
 
 
शिबिराच्या NSS pre-selection camp  आयोजनाकरिता शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक दीपक माळी, विभागीय सहाय्यक संचालक (नागपूर) दिपेंद्र लोखंडे, रासेयो नागपूर विभागीय समन्वयक प्रा. विलास बैलमारे, मुंबई विभागीय समन्वयक प्रा. विनोद गवारे व कोल्हापूर विभागीय समन्वयक प्रा. राजेंद्र कोळेकर यांनी शुभेच्छा दिल्या. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, शिस्तबद्धता आणि देशभतीची भावना अधिक दृढ होऊन प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभाग घेण्याची प्रेरणा लाभणार आहे.
Powered By Sangraha 9.0