अपहार प्रकरणात अनेकांचे हात ओले

28 Sep 2025 19:47:05
वर्धा, 
NREGA fund आर्वी पंचायत समितीत उघडकीस आलेल्या मनरेगा अनुदान गिळंकृत प्रकरणी एपीओ प्रणाली कसर यांना जिप मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांनी तडकाफडकी बडतर्फ केले. सध्या जिल्हास्तरीय समितीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या अपहारात अनेकांनी कमी अधिक प्रमाणात आपले खिशे भरल्याचे पुढे येत आहे. जिल्हास्तरीय समितीच्या चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

NREGA fund 
मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर यांनी २५ लाख २८ हजार ३१९ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याचे आर्वीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. चौकशी सुरू असताना प्रणाली कसर यांना सतीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. प्राथमिक चौकशी अहवाल सादर झाल्यावर त्यांना बडतर्फ केले. यापूर्वी अपहाराची रकम कसर यांनी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या शासकीय बँक खात्यात जमा केली. जिल्हास्तरीय चौकशी समिती व तज्ज्ञ मागील एक दशकाहून अधिकच्या काळात झालेल्या आर्थिक व्यवहाराचे सुक्ष्म निरीक्षण करीत आहेत.
बोरच्या बफर क्षेत्रात मुरले ‘अर्थ’पूर्ण पाणी
मनरेगामध्ये वेंडरचे काम मनरेगा प्रकल्पांसाठी आवश्यक साहित्य पुरवणे हे आहे. चालू आर्थिक वर्षातील अवघ्या चार महिन्यांत एपीओ प्रणाली कसर यांच्या आर्वीच्या स्टेट बँकेत ‘अंबिका’ संस्थेच्या बँक खात्यात ४.११ लाखांचा शासकीय निधी वळता झाल्याचे पुढे आले. या रकमेपैकी ३०.९९ टके रकम बोर व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात येणार्‍या एका गावात कामे केल्याचे दर्शविण्यात ती वळती करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0