महावितरणच्या मनुष्यबळ पुनर्रचनेमुळे दर्जेदार सेवा

28 Sep 2025 19:36:36
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Rajendra Pawar वीज ग्राहकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी आणि कर्मचाèयांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी महावितरणमध्ये मनुष्यबळ पुनर्रचना करण्यात येत आहे. ही पुनर्रचना 1 ऑक्टोबरपासून लागू होईल. परंतु यामुळे कोणत्याही कर्मचाèयाला कमी केले जाणार नाही. याउलट, काही उपविभाग व पदांची संख्येत वाढ होणार आहे.
 
 
 
Rajendra Pawar
सरसकट सर्वच कामे करण्याऐवजी या पुनर्रचनेत कामे विभागून देण्यात येत असल्याने कर्मचाèयांच्या कामाचा ताण कमी होईल व ते अधिक सक्षमपणे ग्राहकसेवा देऊन शकतील अशी माहिती महावितरणचे मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार यांनी दिली.
यवतमाळ येथील नियोजन भवनात शनिवार, 27 सप्टेंबरला आयोजित अमरावती परिमंडळ आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मुख्य अभियंता अशोक साळुंके, अधीक्षक अभियंते प्रवीण दरोली, दीपक देवहाते व दीपाली माडेलवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना पवार म्हणाले, महावितरणमधील मनुष्यबळ पुनर्रचनेबाबत कर्मचाèयांनी कोणतीही भीती बाळगू नये. या पुनर्रचनेत कर्मचाèयांच्या संख्येत कपात केली जाणार नाही. सध्याच्या कामांची विभागणी करून त्यात सुसूत्रता येणार आहे. आणखी फोकस पद्धतीने काम करता येणार आहे. त्यामुळे कामाचा ताण देखील कमी होणार आहे.
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानकांमध्ये 100 पैकी 93 गुण मिळवून महावितरणने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच, ग्राहकांचे वीज बिल शून्यावर आणणाèया ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजने’त महावितरण दुसèया क्रमांकावर आहे. सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास हरित ऊर्जा निर्मितीतही महावितरण देशात प्रथम येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वीज बिल वसुली आणि बिलिंग कार्यक्षमतेत वाढ करण्याबाबत त्यांनी उपाययोजनांची माहिती दिली. महावितरणकडे पुरेसे मीटर उपलब्ध आहेत. त्यामुळे खराब आणि नादुरुस्त मीटर तत्काळ बदलून ग्राहकांना अचूक बिले द्या. तसेच नवीन वीज जोडणीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा, असे निर्देश संचालक राजेंद्र पवार यांनी दिले.
महावितरणमधील ‘सौदामिनीं’च्या कर्तृत्वाचा सन्मान
 
 
नवरात्रोत्सव निमित्ताने महावितरणमधील महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाèयांचा गौरव करण्यासाठी ‘सन्मान सौदामिनींचा’ कार्यक्रम घेण्यात आला. जोखमीच्या विद्युत क्षेत्रात काम करणाèया महिला अभियंता, अधिकारी व कर्मचाèयांच्या योगदानाचे कौतुक करण्यात आले. संचालक राजेंद्र पवार यांनी जिल्ह्यातील महिला कर्मचाèयांशी संवाद साधत त्यांचा सन्मान केला.
Powered By Sangraha 9.0