बसस्थानकावरील वाहतूक निरीक्षक कार्यालय कुलूपबंद

28 Sep 2025 17:28:51
मानोरा,
Manora bus stand locked office शहर व तालुयातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या प्रवासाची आधार असलेली लालपरी ज्या बसस्थानकात येते व येथून पुढच्या प्रवासाला जाते त्या बसस्थानकातील मुख्य कार्यालयालाच कुलूप असल्याने प्रवाशांनी चौकशी कोणाकडे करावी असा सवाल या कुलूपबंद कार्यालयामुळे पुढे येत आहे.
 

Manora bus stand locked office  
मानोरा बसस्थानकाचा कारभार मंगरूळनाथ आगरा मार्फत चालविला जातो. मानोरा बसस्थानकातून कारंजा लाड व यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, दारव्हा तालुयात बसेस येजा करीत असतात. शहर व तालुयातील नागरिकांना तालुयात तथा पर जिल्ह्यात सुरक्षित प्रवास करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या बसस्थानकावर असलेल्या कार्यालयालाच जर कुलुप लावलेले असेल तर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसद्वारा प्रवास करणार्‍या प्रवाशांनी काही अडचण आल्यास अथवा बसेस संदर्भात चौकशी करावयाची असल्यास दुसरा पर्याय महामंडळाने उपलब्ध केलेला नसल्याने या स्थानकामधून प्रवास करणार्‍या नागरिकांना व प्रवाशांना गैरसोईला सामोरे जावे लागत असल्याची स्थिती कुलूपबंद असणार्‍या कार्यालयामुळे अनेकदा उद्भवत असल्याने राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने ही गैरसोय टाळण्याची मागणी या निमित्ताने पुढे येत आहे.
Powered By Sangraha 9.0