वर्धा,
TET सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयाच्या परिणामी बाधित होणार्या शिक्षकांच्या संरक्षणासाठी राज्य शासनाने पुढाकार घेण्याच्या मागणीसाठी राज्यातील शिक्षक संघटनांनी शनिवार ४ ऑटोबर रोजी जिल्ह्यात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली.
शाळातील पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्य केली आहे. त्यानुसार १ सप्टेंबर रोजी ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी शिल्लक आहे त्यांना टीईटीमधून सूट दिली आहे. परंतु, कोणतीही पदोन्नती घेत असल्यास टीईटी आवश्यक केली आहे. ज्या शिक्षकांची सेवा ५ वर्षापेक्षा कमी आहे त्या प्रत्येक शिक्षकाला १ सप्टेंबर २०२७ पूर्वी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. अन्यथा स्वेच्छेने राजीनामा किंवा सेवामुत करण्याचे आदेश दिलेले आहे. शिक्षकांनी वेळोवेळी आवश्यक असणारी पात्रता धारण केली असल्याने राज्य शासनाने शिक्षकांच्या बाजूने उभे राहत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करावी अथवा शिक्षकांच्या संरक्षणासाठी आवश्यक पावले उचलावीत या मागणीसाठी राज्यातील शिक्षक संघटनांनी ४ ऑटोबर रोजी प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.