ठगबाज बंटी-बबलीकडून कार, दुचाकी जप्त

28 Sep 2025 19:02:40
वर्धा,
Wardha bank fraud, अ‍ॅसिस बँकेच्या कर्ज फसवणूक आणि जीएस फायनान्स कंपनीच्या फसवणुकीमधील संबंध उघड झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने ठगबाज बंटी-बबली यांना ताब्यात घेतले. तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत काही खुलासे झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून एक कार आणि एक दुचाकीही जप्त केली आहे. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
 

Wardha bank fraud, 
गजानन सातव यांनी त्यांची पत्नी आणि भागीदार कमलेश धोटे यांच्यासह जीएस फायनान्स कंपनी सुरू केल्याची माहिती आहे. त्यांनी अनेक लोकांची लाखो रुपयांनी फसवणूक केली. अ‍ॅसिस बँकेच्या कर्ज फसवणुकीचा पर्दाफाश झाल्यावर तिन्ही आरोपी आणि आरोपींमधील संबंध उघड झाले. परिणामी, आर्थिक गुन्हे शाखेने कमलेश, गजानन आणि बबली यांना तुरुंगातून ताब्यात घेत अटक केली. चौकशीत अनेक गंभीर खुलासे उघड झाले. पोलिसांनी फसवणुकीच्या रकमेतून खरेदी केलेली एम. एच. ३२ ए. व्ही. ८३७६ क्रमांकाची दुचाकी जप्त केली. ही दुचकी गजाननने नांदुरा येथील एकाकडे १ लाख रुपयांना गहाण ठेवली होती. या फसवणुकीत वापरलेली एम. एच. ३२ ए. एच. ७९३३ क्रमांकाची महागडी कारही जप्त करण्यात आली आहे. सुत्रांनुसार गजानन सातव तीन फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये सहभागी होता. आरोपींच्या कॉल डिटेल्सवरून बँक फसवणुकीतील आरोपी शशिकांत मांद्रे आणि प्रदीप भांडेकर यांच्याशी संबंध असल्याचे पुढे आले आहे. गजाननने मीनाक्षी गेडाम यांच्या नावाने घेतलेल्या २० लाखांच्या कर्जातून ७ लाख आणि रणजित वंजारी यांच्या नावाने घेतलेल्या १० लाखांच्या कर्जातून ४ लाख स्वतःच्या स्वार्थासाठी वापरल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
आतापर्यंत ३ कार, रोख जप्त
बँक कर्ज फसवणुकीच्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत ३ कार, १ दुचाकी आणि अनेक बनावट कागदपत्रे जप्त केली आहे. तसेच आरोपींकडून ४.९० लाखांची रोकड जप्त केली आहे.
Powered By Sangraha 9.0