गुन्ह्यांच्या निर्गतीत गडचिरोली पोलिस ठाणे चमकले

29 Sep 2025 18:18:24
गडचिरोली, 
gadchiroli police station स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून 31 मे 2025 पासून कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याबाबत त्यांचा 27 सप्टेंबर रोजी पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
 
 

पोलीस  
 
 
जून 2025 ते ऑगस्ट 2025 या काळात चव्हाण यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व अंमलदारांच्या मदतीने प्रलंबित गुन्हे व मुद्देमालाच्या निर्गतीवर विशेष लक्ष केंद्रित केले. या कालावधीत एकूण 592 प्रकरणे निकाली काढली. मे 2025 अखेर प्रलंबित असलेल्या 876 व नव्याने दाखल 467 अशा एकूण 1 हजार 343 प्रकरणांपैकी 44 टक्के प्रकरणे निकाली काढली.
गडचिरोली पोलिस स्टेशन अंतर्गत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची संख्या वाढवली.gadchiroli police station सध्या या पोलिस स्टेशनमध्ये 19 अधिकारी व 120 कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचारी वाढल्याने प्रकरणे निकाली काढणे शक्य झाले. मुद्देमालाशी संबंधित एकूण 1 हजार 678 प्रकरणांपैकी 1 हजार 23 प्रकरणे निकाली काढली.
Powered By Sangraha 9.0