जनसुरक्षा विधेयकाचे हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात जोरदार समर्थन

29 Sep 2025 19:23:09
हिंगणघाट,
Jan Suraksha Bill support राज्य सरकारने राष्ट्रहिताकरिता आणलेला जनसुरक्षा विधेयक कायदा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यावश्यक आहे. हा कायदा केवळ आपल्या जीव आणि संपत्तीचीच नव्हे तर वैचारिक, बौद्धिक आतंकवाद्यांपासून आपल्या सभ्यता व संस्कृतीच्या संरक्षणाची हमी देतो. हे विधेयक महाराष्ट्र राज्याच्या भविष्याच्या दृष्टीने व त्यात निहीत असलेल्या भारत वर्षाच्या भविष्याच्या दृष्टीने वरदान सिद्ध होईल. हे विधेयक नक्षलवादास बळ देणार्‍या अराजकता पसरवणार्‍या शहरी भागातील अर्बन नक्षलवाद्यांना त्यांच्या संस्था संघटनांना देश विरोधी कारवायांना उजागर करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची हमी देतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने याचे पूर्णतः समर्थन केले पाहिजे, असे आवाहन अटल पांडे यांनी केले.
 

Jan Suraksha Bill support 
राज्य सरकारने नक्षलवादी, माओवादी यांच्या देशविघातक कृत्यांपासून संवैधानिक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी विशेष जनसुरक्षा विधेयक आणले आहे. पण, नक्षलवादाच्या विरोधातील या सशत कायद्याचा विरोध विरोधी पक्ष करत आहे. त्यामुळे एकप्रकारे देशविघातक शतींना वाचविण्याचे षडयंत्र करीत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे अशावेळी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण राष्ट्रहितार्थ या विधेयकाचे समर्थन करून राज्य सरकारला लवकरात लवकर हा कायदा बनविण्यास बाध्य केले पाहिजे, असे विचार विवेक विचार मंचचे प्रांत संयोजक अतुल शेंडे यांनी व्यत केले.
याप्रसंगी विधेयक समर्थन समिती हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे संयोजक शरद कोणप्रतीवार, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत, सहसंयोजक अमोल अतकर, विवेक विचार मंच जिल्हा संयोजक निहाल गंडाईत, सामाजिक कार्यकर्ते अमोल त्रिपाठी, त्रिशूल लोंढेकर, समीर धारकर, नांदुरकर, प्रसिद्ध उद्योजक विजयसिंग मोहता, विहिंपचे अजय भोंग, गजानन मसाये, सचिन धारकर, देवा वाघमारे, राहुल फटिंग, प्रमोद टिपले, अनुकूल कोचर, राकेश शर्मा, सचिन थारकर, संजय शिरपूरे, माया खरानकर, विद्या पेंडके, प्रीती जोशी आणि नागरिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0