नागपूर,
justice PS Narasimha, न्यायाधीशांनी आपल्या कार्यकाळात दिलेल्या निकालाबाबत ताेलून-मापून बाेलायला हवे. विशेषतः निवृत्तीनंतर तर बाेलूच नये. ज्यांनी एखाद्या प्रकरणावर निकाल दिला असेल ताे निकालच स्वतः बाेलताे. त्यामुळे न्यायाधीशांनी विचारपूर्वक बाेलावे, असा सल्ला सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांनी दिला आहे.हायकाेर्ट बार असाेसिएशन नागपूरर्ते सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांचा शनिवारी साउथ एअरपाेर्ट मेट्राे स्टेशन वर्धा राेड येथील ग्रॅण्ड एअरपाेर्ट बॅक्वेट येथे सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी न्यायमूर्ती नरसिम्हा बाेलत हाेते. यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे व मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलाेर प्रमुख अतिथी हाेते. गायत्री चांदुरकर प्रामुख्याने उपस्थित हाेत्या.
न्यायमूर्ती नरसिम्हा justice PS Narasimha, म्हणाले, वक्तृत्व आणि सत्य हे वकिलीच्या व्यवसायाचे दाेन मुख्य पैलू आहेत. हे दाेन्ही परस्परांशी जाेडलेले आहेत. वकील म्हणून प्रभावी वक्तृत्व महत्त्वाचे असते. खटल्याचा मुख्य उद्देश सत्य शाेधणे असताे. त्यासाठी याेग्य बाजू मांडणे हा मार्ग आहे. वकिलांना अचूकपणे बाेलणे आणि लिहिणे याचे प्रशिक्षण दिले पाहिजे, ही काळाची गरज आहे, असेही ते म्हणाले. न्या. नितीन सांबरे म्हणाले, न्या. चांदुरकर हे ‘परेक्ट जज’ आहेत. त्यांचे निर्णय हे पारदर्शी व मानवीय दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात. न्या. अनिल किलाेर यांनीही न्या. चांदुरकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. हायकाेर्ट बार असाेसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली.
प्रत्येकाची एक विशिष्ठ शैली असते : न्या. चांदुरकर
प्रत्येक व्यक्ती काहीतरी विशिष्ट गुणांनी संपन्न असताे. तसेच प्रत्येकाची काम करण्याची एक विशिष्ठ शैली असते. त्यामुळे ती शैली प्रत्येकवेळी काैतूकास पात्र ठरेल, असेे हाेऊ शकत नाही. मी राेज प्रत्येकाकडून काही ना काही शिकत गेलाे आहे. आपल्या कर्मभूमीत झालेल्या सत्कारामुळे भारावून गेलाे, असे सत्काराला उत्तर देताना न्या. चांदुरकर म्हणाले.