दुबई,
Khawaja Asif gets angry with Modi's post दुबईत झालेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने मात करून नवव्यांदा विजेतेपद पटकावले. विजयाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट करत भारतीय संघाचं अभिनंदन केलं. परंतु मोदींच्या पोस्टवर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ संतापले आणि त्यांनी चिथावणीखोर प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये म्हटले, खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल एकच आहे: भारताचा विजय. आमच्या क्रिकेटपटूंना त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन. त्यावर आसिफ यांनी प्रत्युत्तर देत म्हटले, क्रिकेटची संस्कृती आणि भावना नष्ट करून, मोदी स्वतःचे राजकारण वाचवण्यासाठी उपखंडातील शांततेची शक्यता नष्ट करत आहेत. भारत-पाकिस्तान युद्धाचा स्कोअर 6-0 आहे. अशा प्रकारे आदर आणि शांतता पुनर्संचयित होऊ शकत नाही.

मनोरंजक बाब म्हणजे, 72 तासांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत दावा केला होता की चार दिवसांच्या युद्धात पाकिस्तानी सैन्याने भारतीय हवाई दलाची 7 विमाने पाडली. मात्र, 72 तासांनंतर त्यांच्या संरक्षणमंत्र्यांनी फक्त 6 विमाने पाडल्याचा दावा केला. Khawaja Asif gets angry with Modi's post सतत बदलणाऱ्या या दाव्यांमुळे पाकिस्तानच्या विधानांची विश्वासार्हता अधिकच कमी झाली आहे. आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 19.1 षटकांत 146 धावा केल्या. भारताने प्रत्युत्तरादाखल 19.4 षटकांत 5 गडी गमावून लक्ष्य पूर्ण केले. तिलक वर्माच्या नाबाद 69 धावांनी भारताला विजेतेपद मिळवून दिले. या सर्व घडामोडींवरून स्पष्ट झाले की मैदानावर खरा विजेता भारतच आहे. सोशल मीडियावर आणि आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानच्या दाव्यांमधील गोंधळ त्यांची फजितीच वाढवत आहे.