हरियाणा,
Kurukshetra road accident, हरियाणातील कुरुक्षेत्र-कैथल रस्त्यावर घराडसी गावाजवळ सोमवारी सकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला. दोन चारचाकी वाहनांची – टाटा हैरिअर आणि मारुती स्विफ्ट – समोरासमोर जोरदार धडक होऊन या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात इतका जबरदस्त होता की दोन्ही गाड्यांचे अक्षरशः चिंधड्या उडाल्या.
सकाळी सुमारे सातच्या सुमारास घडलेल्या या अपघाताची आवाज इतकी तीव्र होती की परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेत पोहोचले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करत खिडक्या तोडून वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. मात्र, स्विफ्ट कारमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
स्विफ्ट कारमधील Kurukshetra road accident, प्रवासी प्रवीण, पवन, राजेंद्र, उर्मिला आणि सुमन हे एका कौटुंबिक कार्यानिमित्त अंबालाला निघाले होते. त्यांची घटनास्थळीच प्राणज्योत मालवली. त्यांच्यासोबत असलेली वंशिका गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दुसऱ्या गाडीत – टाटा हैरिअरमध्ये – ऋषिपाल, लीला देवी, संतोष आणि प्रवीण हे पबनावा गावातून अंबालाच्या मुलाना येथे जात होते. काही दिवसांपूर्वी लीला देवी यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्यांना औषधं घेण्यासाठी घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली.
घटनेची Kurukshetra road accident, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या अपघाताबाबत तपास अधिकारी कृष्णकुमार यांनी सांगितले की, “पोलिसांना सकाळी सुमारे सात वाजता अपघाताची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचून स्थानिकांच्या मदतीने मृत आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आलं. या अपघातात तिघे पुरुष आणि दोन महिलांचा मृत्यू झाला असून सर्व मृत यमुनानगर येथील रहिवासी आहेत.”अपघाताचं प्राथमिक कारण हे अतिवेग आणि वाहन चालवताना झालेली असावधता हे समोर आलं आहे. पोलिसांनी संबंधितांचा जबाब नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नागरिकांना रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घेण्याचे आणि वेग मर्यादेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. रस्त्यांवरील वाढती अपघातांची संख्या पाहता, वाहतूक नियमांचं पालन करणं हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक बनलं आहे, हे या दुर्घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.