दुबई,
Naqvi's response to Modi's post आशिया कप 2025 फायनलनंतर भारताने पाकिस्तानचा पराभव करून नवव्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयाच्या आनंदात भारतभर जल्लोष सुरू असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आणि गृहमंत्री मोहसीन नकवी यांना मात्र मोठा धक्का बसला. सामन्यानंतर भारतीय संघाने त्यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला आणि नकवी आशिया कपची ट्रॉफी घेऊन निघून गेले. या घटनेनंतर ते संतप्त झाले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनपर पोस्टवर थेट प्रत्युत्तर दिले.

मोदींनी एक्सवर लिहिले होते, खेळाच्या मैदानावरही ऑपरेशन सिंदूर. निकाल मात्र सारखाच...भारताचा विजय. आपल्या क्रिकेटर्सचं अभिनंदन.” या पोस्टवर नखवींनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत लिहिले. जर युद्ध तुमच्या अभिमानाचं मापदंड असेल, तर इतिहासात पाकिस्तानच्या हातून झालेल्या अपमानजनक पराभवांची नोंद आहे. Naqvi's response to Modi's post कोणताही क्रिकेट सामना ते सत्य पुन्हा लिहू शकत नाही. खेळात युद्ध ओढल्याने केवळ निराशाच उघड होते आणि खेळाच्या आत्म्याला कलंकित करते. भारताच्या विजयानंतर सोशल मीडियावर नकवींची खिल्ली उडाली आणि त्यांच्या अकाउंटवर बंधने आणण्यात आली. भारताने विजय मिळविल्यानंतर बीसीसीआयने खेळाडू व सपोर्ट स्टाफसाठी तब्बल 21 कोटी रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली. या निर्णयामुळे संघाचा आत्मविश्वास दुणावला असून तरुण खेळाडूंनाही नवी प्रेरणा मिळाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
या संपूर्ण मालिकेला राजकीय आणि भावनिक पार्श्वभूमी होती. एप्रिलमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रथमच भारत-पाकिस्तान आमनेसामने आले. त्यामुळे या मालिकेत प्रत्येक सामन्याला युद्धजन्य तणावाचे स्वरूप आले होते. सामन्यांदरम्यान भारतीय खेळाडूंनी एकदाही पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही. फायनलनंतरही याच गोष्टीवरून मोठा वाद पेटला आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगली.
भारताने या विजयासह नवव्यांदा आशिया कपवर नाव कोरले आहे. 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 नंतर पुन्हा एकदा भारताने किताब पटकावला. त्यामुळे या स्पर्धेत भारत हा सर्वाधिक यशस्वी संघ ठरला आहे. हा विजय फक्त मैदानावर मर्यादित न राहता देशभरातील जनमानस जिंकून गेला. बीसीसीआयच्या भव्य इनामामुळे आणि चाहत्यांच्या भावनिक समर्थनामुळे आशिया कप 2025 भारतीय क्रिकेट इतिहासात संस्मरणीय ठरला आहे.