प्रवाशाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यास ताे नुकसान भरपाईस पात्र

29 Sep 2025 12:51:16
अनिल कांबळे

नागपूर,
railway accidental death रेल्वे प्रवास करताना प्रवाशीची काेणतीही चूक नसताना ताे रेल्वेतून खाली पडून मृत्यू झाल्यास ताे ‘अनपेक्षित अपघात’ या श्रेणीत माेडताे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाला मृत प्रवाशाच्या कुटुंबियांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. याच नियमानुसार एका मृत प्रवाशाच्या कुटुंबाला 8 लाख रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
 
 

railway accidental death compensation, 
हासनजी पुरुषाेत्तम कुंभारे हे 4 डिसेंबर 2011 राेजी ब्रह्मपुरी येथून गाेंदिया दिशेने जाणाèया गाडी क्रमांक 58803 बल्लारशाह-गाेंदिया पॅसेंजर रेल्वने प्रवास करीत हाेते. रेल्वेगाडीत गर्दी असल्यामुळे ते गाडीच्या दरवाजाजवळ उभे हाेते. रेल्वेची गती वाढल्यानंतर वडसा रेल्वे स्थानकाजवळ अचानक काहीतरी अडथळा आल्यामुळे गाडीची गती मंदावली आणि जाेरदार धक्का बसला. यामध्ये बरेच प्रवाशांचा ताेल जाऊन एकमेकांच्या अंगावर पडले तर काहींना किरकाेळ मारसुद्धा लागला. मात्र, दरवाजाजवळ उभ्या असलेल्या हासनजी हे थेट दरवाजातून खाली पडले. अचानक घडलेल्या घटनेत हासनजी गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पाेलिसांत नाेंद करण्यात आली.
 
 

रेल्वेकडे नुकसान भरपाईचा दावा
 
 
या घटनेनंतर हासनजी यांच्या आईने रेल्वे कायदा 1989 मधील कलम 124-अ अंतर्गत नुकसानभरपाईसाठी रेल्वे दावे न्यायाधिकरण, नागपूर यांच्याकडे अर्ज दाखल केला हाेता. मात्र, 2016 मध्ये न्यायाधिकरणाने दावा ेटाळला. त्यावेळी दाेन कारणे देण्यात आली मृताकडे प्रवासासाठी वैध तिकीट नव्हते व ही घटना ‘अपघाती दुर्घटना’ ठरत नाही. त्यामुळे हासनजी यांच्या आईचा हिरमाेड झाला. घरातील एकुलता कमावता मुलगा गेल्याने ती खचून गेली.
 
 

उच्च न्यायालयात मागितली दाद
हासनजी यांच्या आईने रेल्वे दावे न्यायाधिकरणाच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपील दाखल केले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने रेल्वे विभागाकडील कागदपत्रे, विभागीय रेल्वे व्यवस्थापकाचा अहवाल तसेच गाडीच्या गार्डचा अहवाल तपासला. त्यातून हासनजी प्रवास करताना स्वतःची काेणतीही चूक नसताना गाडीतून खाली पडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शिवाय त्याच्याकडे वैध तिकीट असल्याचेही पुरावे न्यायालयासमाेर सादर झाले. त्यानुसार प्रवासी जर अपघाती पद्धतीने गाडीतून पडून मृत्युमुखी पडला तर ताे ‘अनपेक्षित अपघात’ मानला जाताे व नुकसानभरपाई मिळण्यास पात्र ठरताे. सर्व पुरावे व कायदेशीर तरतुदी विचारात घेऊन न्यायमूर्ती एम. डब्ल्यू. चांदवाणी यांनी 2016 चा रेल्वे दावे न्यायाधिकरणाचा आदेश रद्द केला. तसेच हासनजी कुंभारे यांच्या कुटुंबाला 8 लाख रुपयांची नुकसानभरपाई तत्काळ अदा करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले.
Powered By Sangraha 9.0