परिस्थितीजन्य पुरावा हा निर्विवादपणे सिद्ध व्हायला हवा

29 Sep 2025 12:44:21
अनिल कांबळे
नागपूर,

Roshan Chaurasia murder नातेवाईक तरुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून तिच्या मित्राचा तिघांनी खून केला हाेता.या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल करुन न्यायालयात आराेपपत्र सादर केले हाेते. मात्र, याेग्य पुरावे आणि तपासातील त्रृट्यांमुळे हत्याकांडातील तीनही आराेपींना न्यायालयाने निर्दाेष मुक्त केले. हा निर्णय द्वितीय सत्र न्यायाधीश.एम.आर. पुरवार यांनी दिला. राजा कुंडलिक भारती ( वय 30), दिनेश मेहता ( वय 30) आणि मिनाबाई कुंडलिक भारती ( वय 50) सर्व रा. मिनीमातानगर नागपूर अशी निर्दाेष मुक्त झालेल्या आराेपींची नावे आहेत. तर राेशन चाैरसिया (30) या युवकाचा चाकूने भाेसकून खून केल्याचा वरील तिघांवर आराेप हाेता. परिस्थितीजन्य पुरावा हा निर्विवादपणे सिद्ध व्हायला हवा, असे निरीक्षण न्यायालयाने या प्रकरणातील निकालाबाबत ताेंडी नाेंदवले.
 

Roshan Chaurasia murder  
काय हाेते प्रकरण
आराेपी राजा याची 22 वर्षीय नातेवाईक आणि राेशन चाैरसिया या दाेघांचे अनैतिक संबंध हाेते. ही बाब राजाला माहिती पडली. त्यामुळे त्याने राेशनची भेट घेऊन दम भरला हाेता. मात्र, ताे ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे चिडलेल्या राजाने आपल्या बहिणीचा दिर दिनेश मेहता याच्याशी संगनमत करुन राेशनचा खून करण्याचा कट रचला. 31 जानेवारी 2020 राेजी मिनीमाता नगरात पाेहचले. त्यांनी राेशनला घासीदास मंदिराच्या परिसरात नेले. तेथे मिनाबाई हजर हाेती. राजा आण दिनेशने चाकूने भाेसकून राेशनचा खून केला. यावेळी मिनाबाई हिने आराेपींना प्राेत्साहन दिले. रात्री अकरा वाजता आराेपी राजा भारती हा चाकूसह कळमना पाेलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. या प्रकरणी कळमना पाेलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करुन तीनही आराेपींना अटक केली.
 
 
 

परिस्थितीजन्य पुरावा ‘परेक्ट’ नव्हता
 
 
कळमना पाेलिसांनी राेशनच्या हत्याकांडानंतर चाकू जप्त केला. मात्र, जप्तीची नाेंद सकाळी करण्यात आली. घटना अकरा वाजताची तर िफर्याद पहाटे पाच वाजता दिली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार हे िफतूर झाले. तसेच जप्तीचा चाकू मालखान्यात ठेवण्याऐवजी ताे पाेलिस निरीक्षकाच्या कक्षात ठेवण्यात आला, त्यामुळे आराेपींवर दाखल केलेल्या हत्याकांडाच्या गुन्ह्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असा दावा आराेपीचे वकील अ‍ॅड. चंद्रशेखर जलतारे, अ‍ॅड.अली यांनी न्यायालयात केला. परिस्थितीजन्य पुरावे असले तरी
परिस्थितीजन्य पुरावा हा निर्विवादपणे सिद्ध व्हायला हवा, असे न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने या तीनही आराेपींची निर्दाेष मुक्तता केली
Powered By Sangraha 9.0