देवस्थानच्या विकासासाठी १५० कोटींचा केंद्रीय पर्यटन निधी प्रस्तावित करा

29 Sep 2025 19:36:10
आजनसरा,
Sant Bhojaji Maharaj Samadhi येथील संत भोजाजी महाराजांचे समाधी स्थळ भाविकांसाठी अलौकिक श्रद्धेचे स्थान असल्याने येथे येणार्‍या लाखो भविकांच्या सुविधेसाठी व दुकान गाळ्यांच्या माध्यमातून बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती व्हावी, या उद्देशाने देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांचा सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, रविवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन देवस्थानच्या विकास कामांसाठी १५० कोटींचा केंद्रीय पर्यटन विकास निधी प्रस्तावित करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 

 Sant Bhojaji Maharaj Samadhi development 
या देवस्थानचा २०२२ ला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केंद्रीय प्रादेशिक पर्यटन प्रसाद योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानुसार नुकतेच पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून पर्यटन संचालनालय मुंबई यांना संपूर्ण विकास आराखडा तयार करण्यासाठी निर्देशित करण्यात आले आहे. या योजनेतून स्थापत्य रचनाकार अभियंता रचित विकास आराखडा १५० कोटींचा प्रस्ताव त्वरित तयार करून आराखड्यावरील केंद्रीय निधीला मंजुरी मिळवून द्यावी, महाराष्ट्र राज्य पर्यटन मंत्रालय तथा ग्राम विकास मंत्रालय विभागाकडून विशेष विकास निधीची तरतूद करून राज्य पर्यटन ब दर्जा मधून भरीव निधीची तरतूद करून लाखो भतांच्या सुविधेसाठी तात्काळ १५० कोटींचा केंद्रीय पर्यटन विकास निधी उपलब्ध करून देण्याची मागणी अध्यक्ष डॉ. विजय पर्बत यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
निधी त्वरित उपलब्ध झाल्यास येणार्‍या भतांच्या सुविधेसाठी भत निवास उभारून मुकामी येणार्‍या भाविक भतांसाठी सोयीचे होणार आहे. तसेच दुकान गाळ्यांची निर्मिती करून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध सुद्धा होणार आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0