दहशतवाद्यांना २ कोटी ट्रान्सफरची बतावणी; साडे चार लाखांची फसवणूक

29 Sep 2025 19:12:59
वर्धा,
fake bank account fraud तुमचे बनावट खाते तयार करून त्याद्वारे दहशतवादी संघटनेला २ कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. तुम्हाला डिजिटल अरेस्ट होऊ शकते, अशी धमकी देत ४ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक करणार्‍यास पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. ही घटना हिंगणघाट येथे उघडकीस आली. सय्यद अशफाक सय्यद अलीम रा. अमरोली, सुरत गुजरात, असे अटक केलेल्याचे नाव आहे.
 

fake bank account fraud 
हिंगणघाट येथील एका व्यतीच्या मोबाईलवर अज्ञात व्यतीला फोन आला. त्याने फिर्यादीस सायबर डाटा प्रोटेशन बोर्ड ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगितले. त्यांचे नावे अंधेरी मुंबई येथे सिम खरेदीक करण्यात आले आहे. त्याद्वारे त्यांचे नावे कॅनरा बँकेत खाते उघडून २ कोटी रुपये दहशतवादी संघटनेला ट्रान्सफर करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या मोबाईलवरून २० लोकांना फसवणुकचे संदेश गेले आहे, असे सांगितले. त्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे पोलिस गणवेशातील तोतया पोलिस अधिकार्‍याने फिर्यादीशी संवाद साधला. फिर्यादी यांना केंद्रीय गुप्तचार संस्था तसेच इतर केंद्रीय तपासी यंत्रणा यांचे वतीने तपास पथके असून तुमची चौकशी सुरू आहे. तुम्हाला डिजीटल अरेस्ट होऊ शकते, अशी भीती दाखविली. यातून सुटण्यासाठी साडे चार लाख रूपयांची मागणी केली. फिर्यादीने भीती पोटी त्याच्या खात्यात साडे चार लाख रुपये ऑनलाइन वळते केले. यानंतरही फिर्यादीला पैसे मागितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान फिर्यादीची रकम सय्यद अशफाक सय्यद अलीम (३६) रा. अमरोली याच्या इंडुसिन्ड बॅक खात्यात वळती झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी थेट गुजराथ घाटून त्याला अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतरकर, अनुप राऊत, ओमप्रकाश कोकाडे, निलेश तेलरांधे, वैभव कट्टोजवार, अमित शुला, रणजित जाधव, अनुप कावळे, संघसेन कांबळे, पवन झाडे, प्रतिक वांदिले, लेखा राठोड, आरती पारीसे यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0