नागपूर,
Vidarbha statehood movement स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची मागणी अनेक दशकांपासून सुरू आहे. देशात काही लहान राज्ये स्थापन झाली असली तरी, विदर्भ अद्याप नवीन राज्य बनलेला नाही. स्वतंत्र राज्य निर्मितीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती सतत आंदोलन करत आहे. जेव्हा विदर्भ महाराष्ट्रात विलीन झाला, तेव्हा पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी नागपूर करारावर स्वाक्षरी केली. या करारात असे नमूद केले होते की विदर्भावर अन्याय केल्या जाणार नाही, परंतु तेव्हापासून विदर्भावर अन्याय होत आहे. ज्यामुळे तो गुलामगिरीकडे ढकलला जात आहे. याचा निषेध म्हणून विदर्भवाद्यांनी रविवारी व्हेरायटी चौकात नागपूर कराराची होळी केली.
याप्रसंगी पुर्व विदर्भाचे अध्यक्ष अरुण केदार, युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली विदर्भवाद्यांनी निषेधार्थ घोषणाबाजी केली. यावेळी रमेश गजबे, नरेश निमजे, राहुल बनसोड, ज्योती खांडेकर, गिरीश तितरमारे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.