नवी दिल्ली,
Chahal-Dhanashree divorce भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि प्रसिद्ध डान्सर-कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या नात्याभोवती गेल्या काही महिन्यांपासून वादळ उठलेलं आहे. मार्च 2025 मध्ये या जोडप्याचा कायदेशीर घटस्फोट झाला आणि त्यानंतर सतत नवे खुलासे समोर येत आहेत. आता धनश्रीनं एका रिअॅलिटी शोमध्ये केलेल्या विधानानं पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. सध्या धनश्री वर्मा ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाली आहे. या शोमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलताना तिनं युझवेंद्रबद्दल धक्कादायक उघडकीस आणलं. लग्न झाल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच महिन्यात चहलला रंगेहाथ पकडलं होतं, असा खळबळजनक दावा तिनं केला. तिच्या या विधानानं सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली असून चाहत्यांमध्येही यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

युझवेंद्र-धनश्री घटस्फोटानंतर दोघांमध्ये आर्थिक वादाचेही दावे करण्यात आले होते. धनश्रीने चहलकडे तब्बल 60 कोटी रुपयांची पोटगी मागितल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी गाजली होती. मात्र शोमध्ये धनश्रीनं या सर्व चर्चांना फेटाळून लावलं. "मी कधीही अशी मागणी केली नाही, या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत, Chahal-Dhanashree divorce असं ती स्पष्टपणे म्हणाली. धनश्री वर्मा एक यूट्यूबर, डान्सर, कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. तिच्या डान्स व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळतात. ती विविध ब्रँड्सच्या जाहिरातींमधून कोट्यवधी रुपये कमावते. तिची संपत्ती सुमारे 25 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. विशेष म्हणजे धनश्री लवकरच एका दाक्षिणात्त्य चित्रपटात झळकणार असल्याची माहितीही समोर आली आहे.
दुसरीकडे युझवेंद्र चहलची संपत्ती तब्बल 45 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. आयपीएल 2025 मध्ये त्याच्यावर 18 कोटी रुपयांची बोली लागली होती. त्याच्याकडे आलिशान बंगला, महागड्या गाड्या आणि जाहिरातींमधून मोठा महसूल आहे. चहल क्रिकेटसोबतच आता वेगवेगळ्या ब्रँड्सचा चेहराही बनला आहे. घटस्फोटानंतर चहल आणि आरजे महावश यांच्यातील नात्यावरही सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यावेळी दुबईतील मैदानावर चहल आणि आरजे महावश एकत्र दिसले होते. त्यानंतर दोघं डेट करत असल्याची चर्चा चाहत्यांमध्ये पसरली. धनश्री वर्माच्या नव्या विधानामुळे मात्र युझवेंद्र चहल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्यांच्या वैवाहिक नात्याचा अंत झाल्यानंतरही या दोघांचं खासगी आयुष्य चाहत्यांच्या उत्सुकतेचं आणि चर्चेचं प्रमुख कारण ठरत आहे.