नागपूर,
East Narsala area पूर्व नरसाळा भागातील प्रिन्स लॉनजवळ रस्त्यावर शेण-कचऱ्याचा प्रचंड ढिगारा निर्माण झाला असून रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. पशुपालकांनी टाकलेल्या शेणात घरगुती कचरा व प्लास्टिक मिसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अरुंद रस्त्यालगतची गटारे फुटून थारोळे साचले असून अतिक्रमणामुळे रस्ता आणखी अरुंद झाला आहे.
यामुळे दुचाकीस्वारांना जीवघेण्या संकटाचा सामना करावा लागत आहे. East Narsala area स्वच्छ ग्राम पुरस्कार मिळालेल्या गावात असे असामाजिक प्रकार घडणे संतापजनक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सौजन्य :राजेश जोशी,संपर्क मित्र