वर्धा,
hinganghat-liquor-sales-rupa : हिंगणघाट पोलिस स्टेशनच्या अभिलेखावर १९ गुन्ह्यांची नोंद असलेल्या रुपा वासे (४५) रा. तेलंगखडी, तहसील वार्ड हिंगणघाट या दारूविक्रेत्या महिलेला एमपीडीए कायद्यान्वये अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
रुपा वासे हिच्यावर हिंगणघाट पोलिस ठाण्यात १९ गुन्ह्यांची नोंद आहे. सन २०१६ पासून ती स्थानबद्ध आहे. तिच्या दहशतीमुळे अनेक लोक तक्रारही देण्यास धजावत नव्हते. तिची गुन्हेगारी थांबत नसल्याने तिच्याविरुद्ध २०२२ मध्ये विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई तसेच सन २०२५ मध्ये उपविभागीय दंडाधिकारी हिंगणघाट यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु, रुपा वासे हिच्या वर्तणुकीत कोणताच बदल घडून न आल्याने तसेच सतत गुन्हे करीत असल्याने स्थानबद्धचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी २९ रोजी स्थानबद्ध आदेश जारी करून महिलेस अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनात अमोल आत्राम, आशिष महेशगौरी, पोलिस निरीक्षक देवेंद्र ठाकूर, प्रवीण देशमुख, विजय हारनूर, संग्राम मुंडे यांनी केली.